उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया निवासस्थानाजवळ एका कारमध्ये आढळलेल्या स्फोटक प्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले सचिन वाझे यांच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयए अधिकाऱ्यांनी मुंबईतील कार्यालयात वाझे यांची शनिवारी प्रदीर्घ चौकशी करण्यात आली़.

    मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया निवासस्थानाजवळ एका कारमध्ये आढळलेल्या स्फोटक प्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले सचिन वाझे यांच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयए अधिकाऱ्यांनी मुंबईतील कार्यालयात वाझे यांची शनिवारी प्रदीर्घ चौकशी करण्यात आली़.

    शनिवारी सकाळी अकरा वाजल्या पासून तब्बल सात तास त्यांची चौकशी करण्यात आली.  याआधी एटीएसने त्यांची चौकशी केली होती. हिरेन यांच्या हत्येमागे वाझे हेच असल्याचा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख यांची पत्नी विमला यांच्या जबाबाचा आधार घेत केला होता. त्यानंतर राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडून एटीएसकडे सोपवला आणि पाठोपाठ वाझे यांची बदलीही करण्यात आली.

    दरम्यान, वाझे यांनी ठाणे न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. तसेच त्यांचे स्टेटस देखील व्हायरल झाले आहे.