धक्कादायक – मलबार हिल भागात कोसळली म्हाडाच्या इमारतीची संरक्षक भिंत, दुर्घटनेत एकाचा मृत्यू

मलबार हिल (Malbar Hill)बाणगंगा येथील बालाजी निवास या इमारतीची संरक्षक भिंत(Safety Wall Collapsed At Malbar Hill) आज कोसळली.

    मुंबई: मलबार हिल (Malbar Hill)बाणगंगा येथील बालाजी निवास या इमारतीची संरक्षक भिंत(Safety Wall Collapsed At Malbar Hill) आज कोसळली. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्याने सांगितले.

    बाणगंगा येथील बालाजी निवास या इमारतीची संरक्षक भिंत शनिवारी सायंकाळी ४.३० वाजता कोसळली. ही इमारत म्हाडाची असून घटनेची माहिती मिळताच अग्निशमक दल, स्थानिक पालिका अधिकारी व कर्मचारी व पोलिसांनी धाव घेतली. या दुर्घटनेत हितेश भुवड (३७) हे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जवळील एलिझाबेथ रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु रुग्णालयात आणण्यापूर्वी भुवड यांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.