साकी नाका बलात्कार प्रकरण: आरोपी 25 दिवस करत होता निर्भयाचा पाठलाग; पोलीसांनी दाखल केले 346 पानांचे आरोपपत्र

मुंबईच्या साकीनाका परिसरातील निर्भया प्रकरणी(Sakinaka rape case) पोलीसांनी 346 पानांचे आरोपपत्र दिंडोशी न्यायालयात सादर केले असून महिलेने दुर्लक्ष केल्यामुळे तिच्यावर आरोपीने हल्ला केल्याचे उघड झाले आहे. ही घटना 10 सप्टेंबर रोजी घडली होती. घटनेच्या तब्बल 25 दिवसांपूर्वीपासून आरोपी महिलेच्या मागे जात होता. ती त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती.

    मुंबई : मुंबईच्या साकीनाका परिसरातील निर्भया प्रकरणी(Sakinaka rape case) पोलीसांनी 346 पानांचे आरोपपत्र दिंडोशी न्यायालयात सादर केले असून महिलेने दुर्लक्ष केल्यामुळे तिच्यावर आरोपीने हल्ला केल्याचे उघड झाले आहे. ही घटना 10 सप्टेंबर रोजी घडली होती. घटनेच्या तब्बल 25 दिवसांपूर्वीपासून आरोपी महिलेच्या मागे जात होता. ती त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती.

    आरोपीची पीडितेशी चांगली ओळख होती, असेही या आरोपपत्रात म्हटले आहे. आरोपपत्रानुसार पोलिसांनी तपासादरम्यान 77 लोकांचे जबाब नोंदवले आहेत. त्या गार्डचा जबाब देखील समाविष्ट आहे ज्याने जखमी अवस्थेत महिलेला पाहून पोलिसांना माहिती दिली होती.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने महिलेवर हल्ला करण्यापूर्वी लांब अंतरापर्यंत तिचा पाठलाग केला आणि निर्जन ठिकाणी पोहचल्यानंतर तिच्यावर दुष्कर्म केले. उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या मते, जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे महिलेला वाचवता आले नाही.