प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

केंद्रीय महिला आयोगाच्या शिष्टमंडळाच्या प्रमुख चंद्रमुखी देवी यानी माध्यमांसमोर प्रतिक्रिया व्यक्त करताना राज्याच्या शासन आणि प्रशासनाच्या बेपर्वा वृत्तीचा निषेध केला. त्या म्हणाल्या की, साकीनाका सारख्या वर्दळीच्या भागात गणेशोत्सवाची तयारी सुरू असताना एका महिलेवर निर्घृण हल्ला करून अत्याचार केला जातो हे राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळल्याचे प्रमाण आहे अशा शब्दात केंद्रीय महिला आयोगाच्या शिष्टमंडळाच्या प्रमुख चंद्रमुखी देवी यानी माध्यमांसमोर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

    मुंबई : महाराष्ट्र सरकारने गेल्या दोन वर्षाच्या काळात महिलांच्या प्रश्नांवर न्याय देण्यासाठी महिला आयोग स्थापन केला नसल्याबद्दल केंद्रीय महिला आयोगाने राज्य सरकारला फटकारले आहे. तसेच सर्वत्र पोलीस तैनात केले जावू शकत नाहीत या मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या विधानाची देखील गंभीर दखल घेतली असून महिलांच्या प्रश्नांबाबत तसेच कायदा सुव्यवस्थेबाबत राज्य शासन आणि पोलीस प्रशासन गंभीर नसल्याचा ठपका ठेवला आहे.

    केंद्राला आयोगाचा अहवाल सादर करणार

    मुंबईतील साकीनाका येथे झालेल्या निर्भयाकांडाचे पडसाद देशभर उमटले आहेत, केंद्रीय महिला आयोगाच्या सदस्या चंद्रमुखी देवी यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने आज संबंधित घटनास्थळासह पोलीस ठाण्यात जावून माहिती घेतली. त्यानंतर पिडीतेच्या कुटूंबियाची भेट घेवून विचारपूस केली. या शिवाय राज्याचे पोलीस महासंचालक यांच्याशी देखील भेट घेवून चर्चा केली. त्या नंतर केंद्र सरकारला आयोग आपला अहवाल सादर करणार असल्याचे त्यानी सांगितले.

    राज्यात कायदा सुव्यवस्था ढासळल्याचे प्रमाण

    केंद्रीय महिला आयोगाच्या शिष्टमंडळाच्या प्रमुख चंद्रमुखी देवी यानी माध्यमांसमोर प्रतिक्रिया व्यक्त करताना राज्याच्या शासन आणि प्रशासनाच्या बेपर्वा वृत्तीचा निषेध केला. त्या म्हणाल्या की, साकीनाका सारख्या वर्दळीच्या भागात गणेशोत्सवाची तयारी सुरू असताना एका महिलेवर निर्घृण हल्ला करून अत्याचार केला जातो हे राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळल्याचे प्रमाण आहे अशा शब्दात केंद्रीय महिला आयोगाच्या शिष्टमंडळाच्या प्रमुख चंद्रमुखी देवी यानी माध्यमांसमोर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

    राज्यात गुन्हेगार निरंकुश

    गेल्या आठवडाभरात राज्यात पुण्यात तीन महिला अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत, या शिवाय अमरावती, वसई आणि अन्य ठिकाणी देखील अश्या सात त्याने घथना घडत असल्याचे समोर येत आहे, त्यामुळे राज्यात गुन्हेगार निरंकुश झाले असून त्यांना पोलीस, समाज आणि कायद्याचा धाक राहिला नसल्याचे दिसत आहे असे निरिक्षण नोंदवत त्यानी याबाबत तिव्र नापसंती व्यक्त केली.

    निर्भया फंडातून मदत नाहीच

    केंद्रीय़ आयोगाच्या शिष्टमंडळाच्या प्रमुख चंद्रमुखी देवी म्हणाल्या की राज्य सरकारने तातडीने राज्य महिला आयोगाचे गठन करायला हवे तसचे पिडितेच्या कुटूंबियाना तातडीने आर्थिक निकषांनुसार निर्भया फंडातून मदत दिली पाहीजे. तसेच या प्रकरणी जलदगती न्यायालयात खटला चालविला पाहीजे.

    महिलांच्या न्यायासाठी राज्य सरकार गंभीर नाही

    कोरोनाच्या काळात अनेक राज्यातील महिला आयोगांनी चांगले काम करत पिडीत महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र महाराष्ट्रात महिला आयोगच अस्तित्वात नसल्याने  तसेच राष्ट्रीय महिला आयोगावर सदस्यांची नेमणूकही केली नसल्याने महिलांना न्याय देण्यात अडचणी येत आहेत. याबाबत केंद्रीय आयोगाला सातत्याने पोलीसांची मदत घ्यावी लागते. त्यामुळे राज्यातील महिलांच्या न्यायासाठी येथील सरकार ग़भीर नसल्याचे स्पष्ट झाले आहे असे त्या म्हणाल्या.

    नगराळेच्या त्या वक्तव्यांची गंभीर दखल

    मुंबईचे पोलीस आयुक्त नगराळे यांच्या त्या वक्तव्यांची देखील आयोगाने गंभीर दखल घेतली असल्याचे त्या म्हणाल्या त्या म्हणाल्या की पोलीस सर्वत्र तैनात नसले तरी त्यांच्या धाक  किंवा भिती गुन्हेगारांमध्ये राहिली पाहीजे ती दिसत नसल्याने गुन्हेगार निरंकुश झाले आहेत, आणि महिलांवर सातत्याने अत्याचारांच्या घटना समोर येत आहेत. याबाबत आपण केद्र सरकारला गंभीर नोंद घेण्याबाबत अहवाल देणार असल्याचे त्यानी सांगितले.