चांदीच चांदी : विना अनुदानित शिक्षकांचे पगार दुप्पट होणार; बिनपगारी शिक्षकांना महिना ११ हजार मिळणार

प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व वर्गतुकडय़ांवरील शिक्षकांना वेतन अनुदान देण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने १४० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

  मुंबई : वर्षानुवर्ष विना अनुदानित शिक्षक म्हणून काम करणाऱ्यांना शिक्षकांना शासकीय वेतनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. अनुदानास पात्र म्हणून घोषित केलेल्या शाळांतील शिक्षकांना वेतन अनुदान देण्याचा जीआर शालेय शिक्षण विभागाने जारी केला आहे. या निर्णयानुसार ज्या शिक्षकांना आजपर्यंत ‘शासकीय वेतन’ मिळत नव्हते त्यांना दरमहा १० ते ११ हजार रुपये, तर ज्या शिक्षकांना आधीपासून वेतन मिळत होते त्यांचे वेतन दुप्पट होणार आहे.

  प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व वर्गतुकडय़ांवरील शिक्षकांना वेतन अनुदान देण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने १४० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

  शासन निर्णयानुसार प्राथमिक ५८१९, माध्यमिक १८,५७५ व उच्च माध्यमिकच्या ८८२० अशा एकूण ३३,२१४ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन अनुदानाचा फायदा होणार.

  नोव्हेंबर २०२०पासून लाभ

  अनुदानास पात्र म्हणून घोषित केलेल्या राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व वर्गतुकडय़ांना नव्याने २० टक्के वेतन अनुदान व २० टक्के वेतन अनुदान घेत असलेल्यांना २० टक्के वाढीव वेतन अनुदान हे १ नोव्हेंबर २०२० पासून मिळणार आहे.

  माध्यमिक शाळेतील १ हजार २७६ शिक्षक–कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी १७ कोटी १३ लाख ८४ हजार रुपयांची तरतूद