एसटी कर्मचाऱ्यांना महिनाखेरीस पगार ?

मागील अनेक महिन्यांपासून एसटी तोट्यात सुरू आहे. एसटीला नवसंजीवनी देण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहे. पण राज्य सरकारला मात्र अपयश येत आहे. यामुळेच एसटी कर्मचाऱ्यांचे नियमित वेतन होत नसल्याची बाब अनेक महिन्यांपासून सोमर येत आहे. एसटी कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याचे वेतन अद्याप मिळाले नाही. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या मधून संताप व्यक्त केला जात आहे.

    मुंबई : एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याचे वेतन मिळाले नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. मागील अनेक महिन्यांपासनू एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत राज्य सरकार चालढकल करत आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी राज्य सरकारकडे पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने वेतन रखडले असल्याचे अधिकारी सांगत आहेत. दरम्यान, बुधवारी रात्री उशीरा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या एका बैठकीत एसटी महामंडळाला कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी निधी देण्याचे मंजुर झाले असल्याचे समजते, यामुळे ऑगस्ट महिन्याच्या अखेरीपर्यंत कर्मचाऱ्यांचे पगार होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

    मागील अनेक महिन्यांपासून एसटी तोट्यात सुरू आहे. एसटीला नवसंजीवनी देण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहे. पण राज्य सरकारला मात्र अपयश येत आहे. यामुळेच एसटी कर्मचाऱ्यांचे नियमित वेतन होत नसल्याची बाब अनेक महिन्यांपासून सोमर येत आहे. एसटी कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याचे वेतन अद्याप मिळाले नाही. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या मधून संताप व्यक्त केला जात आहे.

    घरखर्च चालविताना कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कर्मचाऱ्यांना वेतन नियमित मिळण्याबाबत कर्मचारी संघटनांना वेळोवेळी राज्य सरकारबरोबर बैठक घेतली. पण वेतन नियमित होण्यास अडचणी येत असल्याचे संघटनेकडून सांगण्यात येत आहे.