Sambhaji Bhide meets Eknath Shinde; Discussions abound in political circles

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी शिवसेनेचे नेते तसेच राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे यांची भेट घेतली. दरम्यान, बुधवारी खासदार उदयनराजे भोसले यांनी शिंदे यांची भेट घेतली होती व लगेचच दुसऱ्या दिवशी भिडे यांनी शिंदे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

    मुंबई : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी शिवसेनेचे नेते तसेच राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे यांची भेट घेतली. दरम्यान, बुधवारी खासदार उदयनराजे भोसले यांनी शिंदे यांची भेट घेतली होती व लगेचच दुसऱ्या दिवशी भिडे यांनी शिंदे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

    खासदार उदयनराजे यांनी मराठा आरक्षण व सातारा शहरातील विविध विकासकामे याबाबत भेट घेतल्याचे सांगितले. मात्र लगेचच दुसऱ्या दिवशी भिडे यांनी भेट घेतल्याने या दोन्ही भेटीमधून नक्कीच वेगळे काय तरी घडणार याची चर्चा आता सुरू झाली आहे. भिडे गुरुजी यांना भेटीबाबत विचारले असता त्यांनी भेटीचे कारण सांगण्यास नकार दिला.

    मात्र एका तासाहून अधिक काळ चाललेल्या कमराबंद चर्चेमुळे राजकीय वर्तुळात नक्कीच उलथापालथ होणार की आगामी निवडणूकांमध्ये वेगळेच चित्र पहावयास मिळणार याबाबत तर्क वितर्क लढविले जात आहेत.