MP Sambhaji Raje criticizes the state government if the Maratha reservation is affected

नाशिकमध्ये २६ सप्टेंबरला झालेल्या मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठकीला छत्रपती संभाजीराजे भोसले उपस्थित होते. मराठा आंदोलनाबाबत उगाच भांडणं लावणाऱ्यांना ठोका असा आदेशच खासदार संभाजीराजेंनी आपल्य समर्थकांना दिला आहे. राज्य सरकारला आरक्षण देता येत नसेल तर सरसकट आरक्षण रद्द करुन गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांची निवड करा, असे वक्तव्य खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले होते. याच वक्तव्यावर छत्रपती संभाजीराजे यांनी असहमती दर्शवली आहे.

मुंबई : राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजेंनी  (Sambhaji Raje) छत्रपती उदयनराजे भोसले (Udayan Raje) यांच्या सरसकट आरक्षण रद्द करण्याच्या भूमिकेशी असहमती दर्शवली आहे. मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) निर्णयाचा विषय खंडपीठाकडे वर्ग झाल्याने मराठा समाजात संतापाचे वातावरण आहे. राज्य सरकारला आरक्षण देता येत नसेल तर सरसकट आरक्षण रद्द करुन गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांची निवड करा, असे वक्तव्य खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले होते. याच वक्तव्यावर छत्रपती संभाजीराजे यांनी असहमती दर्शवली आहे. तसेच मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरुन छत्रपती संभाजी राजे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

नाशिकमध्ये २६ सप्टेंबरला झालेल्या मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठकीला छत्रपती संभाजीराजे भोसले उपस्थित होते. मराठा आंदोलनाबाबत उगाच भांडणं लावणाऱ्यांना ठोका असा आदेशच खासदार संभाजीराजेंनी आपल्य समर्थकांना दिला आहे.

तसेच सर्व मराठी संघटनांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. आपली ताकद काय आहे ते दाखवून देऊ. सर्व प्रकारच्या जबाबदारी निश्चित ठरवू, समाजातील सर्व विद्वानांना एकत्र करु आणि वेगवेगळ्या दबाव निर्माण करणाऱ्या समिती तयार करु अस छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले होते खासदार उदयनराजे भोसले

मराठा आरक्षण देता येत नसेल तर सगळंच आरक्षण रद्द करा आणि गुणवत्तेनुसार आरक्षण द्या, अशी मागणी छत्रपती उदयनराजे भोसले यांनी काल केली होती. मराठा समाजातील मुलांना चांगले गुण मिळूनही अ‍ॅडमिशन मिळत नाही, मात्र इतर समाजात कमी गुण असतानाही प्रवेश मिळतो. देवाने प्रत्येकाला बुद्धी दिली, आहे त्याप्रमाणे अभ्यास केला पाहिजे. अभ्यास करुन, मार्क असूनही अ‍ॅडमिशन न मिळाल्यामुळे मराठा समाजातील अनेक मुलांना नैराश्य येत आहे, अशी खंत उदयनराजे यांनी व्यक्त केली.