समीर वानखेडेंची पोलीस महासंचालकांशी भेट ; मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप करत केली तक्रार

आर्यन खानचा जामीन अर्ज तिसऱ्यांदा फेटाळून देण्यात आलाय. क्रूझवरील अमलीपदार्थ पार्टीप्रकरणी अटकेत असलेल्या आर्यन खानकडून कोणत्याही प्रकारचे अमलीपदार्थ हस्तगत करण्यात आले नसताना त्याला कोठडीत ठेवणे उचित नाही. असे करून त्याचे व्यक्तिस्वातंत्र्य पणाला लावले जात आहे. त्यामुळे त्याच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी आर्यनच्या वकिलांनी सोमवारी विशेष सत्र न्यायालयात केली होती.

    केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथकाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांची सोमवारी भेट घेतली. या भेटीत त्यांनी मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप करत तक्रार केली आहे. एनसीबीवर मुंबई पोलिसांकडून पाळत ठेवण्यात येत असल्याची तक्रार त्यांनी केली.वानखेडे यांच्यासह एनसीबीचे उपमहासंचालक मुथा अशोक जैन हे देखील यावेळी उपस्थित होते.

    काय आहे तक्रार

    वानखेडे यांनी काही लोक माझ्या हलचालींवर लक्ष ठेऊन आहेत, असं जैन आणि पांडे यांना सांगितल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. दोनजण वानखेडे यांच्यावर पाळत ठेवत त्यांच्या मागावर असल्याचे सीसीटीव्ही फुटेजही हाती लागल्याची माहिती देण्यात आली आहे. हे प्रकरण फार गंभीर आहे असं सांगत वानखेडे यांनी यावर थेट प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय.

    दरम्यान, २ ऑक्टोबरच्या रात्री एनसीबीने केलेल्या कारवाईमध्ये आर्यन खानसहीत आठ जणांना ताब्यात घेतलं आहे. तसेच या आठही जणांपैकी कोणालाही अद्याप जामीन मंजूर करण्यात आलेला नाही. आर्यन खानचा जामीन अर्ज तिसऱ्यांदा फेटाळून देण्यात आलाय. क्रूझवरील अमलीपदार्थ पार्टीप्रकरणी अटकेत असलेल्या आर्यन खानकडून कोणत्याही प्रकारचे अमलीपदार्थ हस्तगत करण्यात आले नसताना त्याला कोठडीत ठेवणे उचित नाही. असे करून त्याचे व्यक्तिस्वातंत्र्य पणाला लावले जात आहे. त्यामुळे त्याच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी आर्यनच्या वकिलांनी सोमवारी विशेष सत्र न्यायालयात केली होती. जामीन अर्जावर तातडीने सुनावणीची आवश्यकता नसल्याचे सांगत अर्जावर उत्तर दाखल करण्यासाठी आठवडय़ाची वेळ देण्याची मागणी एनसीबीतर्फे करण्यात आली. न्यायालयाने मात्र प्रकरणावरील सुनावणी बुधवारी ठेवत एनसीबीला उत्तर दाखल करण्याचे आदेश दिलेत.