sandeep deshpande

सरकारचं विज बिल मोठ्या प्रमाणात वाढवलेलं आहे. त्यामुळे  लॉकडाऊन झालं तर राज्यातील जनता जगणार कशी ? सरकारची घाणेरडी प्रकरणं बाहेर पडत आहेत, त्यासाठी लॉकडाऊन करणार का, असा प्रश्न मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारला विचारलाय.

    मुंबई : राज्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे राज्य सरकारने निर्बंध लावण्यास सुरुवात केली आहे. आता लॉकडाऊन करण्याची वेळ येत आहे. हा शेवटचा इशारा, नियम पाळा अन्यथा नाईलाजास्तव लॉकडाऊन करावं लागेलं, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला होता, यावरुन आता मनसे आक्रमक झाली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी वक्तव्य केलं आहे.

    सरकारचं विजबील मोठ्या प्रमाणात वाढवलेलं आहे. त्यामुळे  लॉकडाऊन झालं तर राज्यातील जनता जगणार कशी ? सरकारची घाणेरडी प्रकरणं बाहेर पडत आहेत, त्यासाठी लॉकडाऊन करणार का, असा प्रश्न मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारला विचारला आहे.

    कोरोनाचा उद्रेक महाराष्ट्रामध्येचं कसा वाढला. गोवा, गुजरात आणि कर्नाटक या राज्यात कोरोना नाही, रोज सरकारचे घाणेरडे प्रकरण बाहेर पडत आहेत, त्यांमुळे राज्य सरकार लॉकडाऊन करणार असल्याचंही देशपांडे बोलत होते.