‘सगळेच रामभरोसे आहे पण त्यात काहीच राम नाही’,संदीप देशपांडेंची केंद्र- राज्य सरकारवर टीका

राज्यातील कोरोना स्थितीत केंद्र आणि राज्य सरकारच्या नियोजन शुन्यतेकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न संदीप देशपांडे(sandeep deshpande) यांनी केला आहे.

  मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे(sandeep deshpande) नेहमीच त्यांच्या थेट वक्तव्याने चर्चेत असतात. आता नव्याने व्टिट करताना देशपांडे यांनी केंद्र आणि राज्य सरकारला अंगावर घेतले आहे.

  त्यांनी व्टिट करत म्हटले आहे की, “लसीकरण आहे पण लस नाही. खाटा आहेत पण ऑक्सिजन नाही, उपचार आहे पण औषध नाही, व्यापारी आहे पण व्यापार नाही, लोक आहेत पण नोकरी नाही, मन की बात आहे पण मनातलं नाही, मुख्यमंत्री आहेत पण रस्त्यावर नाहीत, सगळंच रामभरोसे आहे पण त्यात काहीच राम नाही.”


  प्राणवायू, रेमडेसिवीर टंचाई
  राज्यातील कोरोना स्थितीत केंद्र आणि राज्य सरकारच्या नियोजन शुन्यतेकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न संदीप देशपांडे यांनी केला आहे. एकिकडे प्राणवायू दुसरीकडे कोरोनासाठी उपयुक्त ठरत असलेल्या रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे राज्यातील नागरिक हवालदिल झाले आहे. यावरुन मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज्यासह केंद्र सरकारवर टीका केली आहे.

  लसीकरण रामभरोसे
  राज्यात दुसरीकडे कोरोना लसीची साठा अपुरा पडत आहे. त्यामुळे अनेक लसीकरण केंद्र बंद झाली आहेत. कोरोनापासून बचाव होण्यासाठी लसीकरण मोहिमेला अधिक गती देण्याची गरज आहे. १ मे पासून १८ वर्षावरील प्रत्येकाला लस देण्यासाठी केंद्र शासनाने परवानगी दिली आहे मात्र लस उपलब्ध नसल्याने लसीकरण रामभरोसे राहीले आहे.