पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याचा जो विचार सुरु आहे त्याला आमचा विरोध : संजय निरुपम

गेल्या वर्षी जो लॉकडाऊन लागू केला होता त्यामुळे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात लोकांना बेराजगारीचा सामना करावा लागला होता. कारखाने बंद झाले होते आणि व्यवसायावर मोठा परिणाम झाला होता, असं संजय निरुपम म्हणाले आहेत. सव्वा तीन कोटी लोक लॉकडाउनमुळे गरीब झाल्याचा एक रिपोर्ट आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन आणून लोकांना त्रास देऊ नका, असं सांगताना संजय निरुपम यांनी निर्बंध लावण्याला समर्थन दर्शवलं आहे.

    राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. त्यामुळे ठाकरे सरकारने पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्याचा विचार करत असल्याची चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेससह अनेक नेत्यांनी लॉकडाऊनला जाहीर विरोध केला आहे. काँग्रेस नेते संजय निरुपम यांनीदेखील लॉकडाऊनवरुन संताप व्यक्त केला आहे.

    कारण गेल्या वर्षी जो लॉकडाऊन लागू केला होता त्यामुळे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात लोकांना बेराजगारीचा सामना करावा लागला होता. कारखाने बंद झाले होते आणि व्यवसायावर मोठा परिणाम झाला होता, असं संजय निरुपम म्हणाले आहेत. सव्वा तीन कोटी लोक लॉकडाउनमुळे गरीब झाल्याचा एक रिपोर्ट आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन आणून लोकांना त्रास देऊ नका, असं सांगताना संजय निरुपम यांनी निर्बंध लावण्याला समर्थन दर्शवलं आहे.

    तुम्हीच चित्रपटगृहाच्या बाहेर आणि मॉलच्या बाहेर जे लोक येत आहेत त्यांना पकडता आणि जबरदस्तीने ट्रेस करता. त्यांच्याकडून २५० रुपये घेतले जातात. त्याऐवजी त्यांना लस द्या. जास्तीत जास्त लोकांना लस दिली पाहिजे. पण लॉकडाउन नको, असं स्पष्ट मत संजय निरुपम यांनी व्यक्त केलं आहे.