sanjay nirupam

बॉलिवूड मुंबईमधून उत्तर प्रदेशमध्ये(moving bollywood in uttar pradesh) हलवण्याच्या हालचाली सुरु आहेत. यावर अनेक पक्षांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस नेते संजय निरुपम यांनीही यावर आपले मत(sanjay nirupam reaction) मांडले आहे. संजय निरुपम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “बॉलिवूडला कोणीही कुठं घेऊन जाऊ शकत नाही आणि त्याला कोणत्याही राजकीय पक्षाच्या संरक्षणाची आवश्यकता नाही.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आलेले आहेत.  मुंबईतील बॉलिवूड स्थलांतरणाच्या चर्चांवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.विविध पक्षाचे नेेते यावर प्रतिक्रिया देत आहे. काँग्रेसचे नेते संजय निरुपम(sanjay nirupan reaction on Bollywood migration) यांनी देखील आपले मत व्यक्त केले आहे.

संजय निरुपम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “बॉलिवूडला कोणीही कुठं घेऊन जाऊ शकत नाही आणि त्याला कोणत्याही राजकीय पक्षाच्या संरक्षणाची आवश्यकता नाही. चित्रपटाच्या चाहत्यांनी आपल्या कष्टाने हे सग‌ळं उभं केलं आहे. ही अतंर्गत प्रक्रिया गेल्या शंभर वर्षांपासून सुरू आहे. नेते मंडळींनी याचे स्थलांतरण करण्याच्या किंवा याला वाचवण्याच्या गोष्टी करु नये.


आज मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे चित्रपटसृष्टी तसेच उद्योगजगतातील मान्यवरांशी चर्चा करणार आहेत. उत्तर प्रदेशात मुंबईच्या धर्तीवर चित्रनगरी उभारण्याची योजना असून यावरून राजकारणही तापले आहे. उत्तर प्रदेशातील गुंतवणूकीबाबत ज्येष्ठ उद्योगपती, उद्योग समूहांच्या उच्चपदस्थांशी आणि चित्रपट उद्योगातील दिग्गजांशी योगी आदित्यनाथ विचारविनिमय करून त्यांना आमंत्रित करणार आहेत. यामध्ये टाटा, एन चंद्रशेखर, बाबा कल्याणी, हिरानंदानी आदी मान्यवरांचा समावेश आहे. तसेच सिनेसृष्टीतील दिग्गजांबरोबर देखील ट्रायडेंट हॉटेलमध्ये योगींची बैठक होणार आहे.