शरीरसुखाची मागणी केल्याच्या प्रकरणात क्लीन चिट दिल्यानंतर संजय राठोडांची पहिली प्रतिक्रीया, म्हणाले की…

रीरसुखाची मागणी केल्याच्या आरोपांप्रकरणी माजी मंत्री संजय राठोड यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. पोलिसांना पाठवण्यात आलेल्या अर्जामध्ये महिलेच्या पतीचं नाव चुकलेलं आहे. संजय राठोड यांच्याविरुद्ध अशी कोणतीही तक्रार नाही, असं यवतमाळ पोलिसांनी सांगितलं आहे. क्लीन चिट मिळाल्यानंतर संजय राठोडांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    मुंबई : शरीरसुखाची मागणी केल्याच्या आरोपांप्रकरणी माजी मंत्री संजय राठोड यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. पोलिसांना पाठवण्यात आलेल्या अर्जामध्ये महिलेच्या पतीचं नाव चुकलेलं आहे. संजय राठोड यांच्याविरुद्ध अशी कोणतीही तक्रार नाही, असं यवतमाळ पोलिसांनी सांगितलं आहे. क्लीन चिट मिळाल्यानंतर संजय राठोडांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    रोठोडांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे. सत्य परेशान हो सकता है, पराजित नही….., असं सूचक ट्विट संजय राठोड यांनी केलं आहे. तसेचं महिलेच्या नावाने कुणीतरी खोडसाळपणे स्पीड पोस्टाने हा तक्रार अर्ज केल्याचं निष्पन्न झालेलं आहे. तसेच अर्जात नमूद केलेल्या महिलेचा आणि महिलेच्या कुटुंबाचा तक्रार अर्जाशी काहीही संबंध नाही, असं यवतमाळचे एसपी दिलीप पाटील यांनी सांगितलं आहे.

    दरम्यान विशेष चौकशी पथकाने केलेल्या चौकशीअंती माजी मंत्री आणि शिवसेना आमदार संजय दुलीचंद राठोड यांच्याविरुद्ध करण्यात आलेला तक्रार अर्ज महिलेने स्वतः पाठवलेला नाही. या अर्जामध्ये महिलेच्या नावाचा वापर करण्यात आला आहे. अर्जावरील सही त्या महिलेची नाही. महिलेच्या पतीचे नावसुद्धा चुकीचे टाकलेलं आहे, असं एसपी दिलीप पाटील यांनी सांगितलं आहे.