काँग्रेसचं सरकार असताना झालेल्या पुण्याईमुळेच देशाचा कारभार सुरु, संजय राऊत यांची मोदी सरकारवर टीका

राहुल गांधी यांचं म्हणणं सरकारने गांभीर्यानं ऐकलं पाहिजे. सरकारची दोन वर्षे तर कोरोनामध्येच निघून गेली. देशासाठी अजून बरंच काही करणं बाकी आहे. गेल्या ६० वर्षातील पंडित नेहरु ते राजीव गांधी, नरसिंह राव यांच्यापर्यंतचा जो लेखाजोखा आहे त्याच पुण्यावर देश चालत आहे. नवीन काही झालेलं नाही पण आपण अपेक्षा करु शकतो,असं संजय राऊत यांनी सांगितलं.

    शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारच्या सात वर्षांच्या कामगिरीवर टीका केली आहे. मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी देशासाठी अजून बरंच काही करणं बाकी असल्याचं म्हटलं आहे. तसंच नवीन काही झालेलं नाही, पण आपण अपेक्षा करु शकतो असंही म्हटलं आहे.

    राहुल गांधी यांचं म्हणणं सरकारने गांभीर्यानं ऐकलं पाहिजे. सरकारची दोन वर्षे तर कोरोनामध्येच निघून गेली. देशासाठी अजून बरंच काही करणं बाकी आहे. गेल्या ६० वर्षातील पंडित नेहरु ते राजीव गांधी, नरसिंह राव यांच्यापर्यंतचा जो लेखाजोखा आहे त्याच पुण्यावर देश चालत आहे. नवीन काही झालेलं नाही पण आपण अपेक्षा करु शकतो,असं संजय राऊत यांनी सांगितलं.

    देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून अनेक वर्षे गेली, पण पंडित नेहरुंपासून ते राजीव गांधीपर्यंत, नरसिंह राव, मनमोहन सिंग यांच्या सरकारपर्यंत जर आपण लेखाजोखा पाहिला तर हा देश उभा राहिलेला दिसतो. या देशात अनेक योजना, प्रकल्प दिसत आहेत. देशाची अर्थव्यवस्था आपण पाहिली. त्याच मागच्या पुण्याईवर आजही देश तरलेला आहे, मागची सात वर्षेसुद्धा…हे कोणालाही नाकारता येणार नाही,” अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.