Even Fadnavis had used threatening language when he was the Chief Minister Criticism of Sanjay Raut

चारित्र्य हननाचे प्रयत्न होतच राहतील. मात्र त्यामुळे महाविकास आघाडी धोक्यात येईल, हा भ्रम असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर शेतकरी आंदोलनावरून त्यांनी केंद्र सरकारला सल्लाही दिला. सरकारला पाऊल मागे घेण्याचा सल्ला आपण देणार नाही, मात्र सरकारने समन्वयाची आणि तडजोडीची भूमिका घ्यायला हवी, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच नव्हे, तर महाविकास आघाडीच्या नेत्यांना टार्गेट केलं जात असल्याची प्रतिक्रीया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलीय. काही गोष्टी या खासगी आणि कौटुंबिक असतात. त्या त्याच पद्धतीने सोडवल्या गेल्या पाहिजेत, असं राऊत म्हणाले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी काही भूमिका स्पष्टपणे ठरवल्या होत्या. त्यानुसार कौटुंबिक गोष्टी राजकारण आणणे आणि राजकारणात कौटुंबिक गोष्टी आणणे योग्य नसल्याचं ते म्हणाले. धनंजय मुंडे यांचा विषय हा त्यांच्यावरच सोडला पाहिजे, असा सल्लाही त्यांनी राजकीय विरोधकांना दिलाय.

चारित्र्य हननाचे प्रयत्न होतच राहतील. मात्र त्यामुळे महाविकास आघाडी धोक्यात येईल, हा भ्रम असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर शेतकरी आंदोलनावरून त्यांनी केंद्र सरकारला सल्लाही दिला. सरकारला पाऊल मागे घेण्याचा सल्ला आपण देणार नाही, मात्र सरकारने समन्वयाची आणि तडजोडीची भूमिका घ्यायला हवी, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

राजकारणात कुणीही कायमचा शत्रू आणि मित्र नसतो. भाजपासोबत आम्ही पंचवीस वर्ष काम केले आहे. आम्ही त्यांना शत्रू मानायला तयार नाही. जरी विरोधी पक्षात असले तरी ते आमचेच सहकारीच आहेत. त्यांनी गोड बोलावे, गोड हसावे, सरकारच्या बाबतीत गोड विचार करावा आणि महाराष्ट्राला गोड दिवस आणावे ह्याच शुभेच्छा असल्याचा टोमणाही त्यांनी हाणला.

नवाब मलिक सातत्याने महाविकास आघाडीची भूमिका भक्कमपणे मांडत असतात. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना त्रास दिला जातो. केंद्रात आणि राज्यात वेगवेगळी सरकारे असतात, तेव्हा अश गोष्टी घडत राहतात, असंही ते म्हणाले.