sanjay raut

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटले आहे की, बादशाह तो वक्त होता है.... इन्सान तो युं ही गुरुर करता हे, असा शायरी करत हिंदी भाषेत भाजपाला टोलावले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

बिहार : बिहार विधानसभा निवडणूकीचा ( Bihar election results) अंतिम निर्णय अवघ्या तासांवर आला आहे. बिहाच्या विधानसभा निवडणूकीत भाजपचे (BJP) पारडे उलटण्याची दाट शक्यता दिसत आहे. तर राजदचे नेते तेजस्वी यादव (Tejashvi yadav) यांचे पारडे जड असल्याचे दिसत आहे. विधानसभा निकालापूर्वीच राजदचे नेते तेजस्वी यादव यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. महाराष्ट्रातील शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Rau) यांनी बिहार विधानसभा निवडणूक निकालापूर्वीच ट्विट करत भाजपला टोला लगावला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटले आहे की, बादशाह तो वक्त होता है…. इन्सान तो युं ही गुरुर करता हे, असा शायरी करत हिंदी भाषेत भाजपाला टोलावले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

बिहार विधासनभा निवडणुकीत मुख्यमंत्री पदाचे दावेदार असलेले राजदचे नेते तेजस्वी यादव यांच्यावर निकालापूर्वीच कार्यकर्त्यांकडून शुभेंच्छांचा वर्षाव होत आहे. बिहारमध्ये तेजस्वी यादव यांचा मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर, पोस्टर शहरांत लावले आहेत. बिहारमध्ये निकालापूर्वीच मोठं-मोठे बॅनर तेजस्वी यांचा मुख्यमंत्री उल्लेख करत लावले गेले आहेत.