महाराष्ट्रातील मध्यावधी निवडणुकींबाबत संजय राऊतांनी केलं चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचं खंडन

शिवसेना पुन्हा भाजपसोबत युती करणार का ? तसेच राज्यात मध्यावधी निवडणुका होऊ शकतात, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil)  यांनी केलं आहे. त्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्त्यव्यांचं (statement ) खंडन केलं आहे.

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यांच्यात झालेल्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाणं आलं आहे. शिवसेना पुन्हा भाजपसोबत युती करणार का ? तसेच राज्यात मध्यावधी निवडणुका होऊ शकतात, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil)  यांनी केलं आहे. त्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्त्यव्यांचं (statement ) खंडन केलं आहे. राज्यात मध्यावधी निवडणुका घ्यायच्याच असतील तर राजभवनात जाऊन सांगावं लागेल, असा मिश्किल टोला देखील संजय राऊत यांनी लगावला आहे.

राजकीय चर्चा करणं गुन्हा आहे का? जर दोन राजकीय नेते भेटत असतील दर देशाबद्दल, कृषी विधेयक, जम्मू-काश्मीर, चीन, पाकिस्तान, करोनाबद्दलच चर्चा होते, असं म्हणत संजय राऊत यांनी चर्चांना पुर्णविराम दिला आहे. चंद्रकांत पाटील यांच्या विधानाकडं सकारात्मक दृष्टीने पाहतोय. ते नेहमीच त्यांच्या भूमिका सकारात्मक मांडत असतात. मध्यावधी निवडणुका लागणार आहेत. निवडणूक आयोगाची जबाबदारी चंद्रकांत पाटील यांच्याकडे आली असेल तर स्वागत आहे. असे संजय राऊत म्हणाले.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील ?

दरम्यान, भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ‘राज्यात मध्यावधी निवडणुका होऊ शकतात अशी परिस्थिती आहे, मध्यावधी निवडणूका कोणालाच नको आहेत. मध्यावधी निवडणूका होऊ नये म्हणून सगळेच प्रयत्न करतील पण शेवटी कोणाचीच कॉम्बिनेशन जुळली नाहीत, तर काहीही पर्याय उरणार नाही,’ असं वक्तव्य केलं आहे.

संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे…

‘सामना’ च्या सर्व मुलाखती ‘अनकट’च असतात आणि देवेंद्र फडणवीसांची मुलाखत ही देखील ‘अनएडिटेड’च असेल, असं स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिलं आहे. संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे राज्यातील महत्त्वाचे नेते आहेत. ‘मुलाखतीची तारीख ठरवण्यासाठी फडणवीसांना पुन्हा भेटणार आहे. त्याचबरोबर अमित शाह आणि राहुल गांधींचीही मुलाखत घेणार असल्याचं राऊत यांनी यावेळी सांगितलं. तसेच गुप्तेश्वर पांडे यांनी महाराष्ट्र पोलिसांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला, हा आक्षेप आहे.निवडणूक लढावी की नाही हा त्यांचा प्रश्न आहे, पण यासाठी केला होता का अट्टाहास, हा खरा प्रश्न आहे. असे संजय राऊत म्हणाले.