डॉक्टरांविषयी केलेल्या विधानावर संजय राऊतांचे स्पष्टीकरण, भाजपवर केली टीका

विरोधक आणि राजकारणी मंडळी मोहीम चालवत असतील तर ते चुकीचे आहे. बोलण्याच्या ओघात मी कोणत्याही प्रकारे डॉक्टरांचा अपमान केला नाही. माझ्याकडून बोलताना कोटी झाली, त्यामुळे याचा कोणी गैरसमज करु नये. मला काही राजकारणी माफी मागायला सांगत आहे. परंतु मी कोणाचाही अपमान केलाच नाही. असेही संजय राऊत म्हणाले आहेत.

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी डॉक्टरांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. ‘डॉक्टरांपेक्षा कंम्पाउंडर बरा’ असे विधान संजय राऊत यांनी केले होते. त्यावर भाजप नेत्यांनी आक्षेप घेत संजय राऊत यांना डॉक्टरांची माफी मागावी अशी मागणी करत होते. त्यामुळे वातावरण अगदी ढवळून निघाले आहे. या प्रकरणावर संजय राऊत यांनी स्पष्टीकरण देत खुलासा केला आहे. 

संजय राऊत यांनी माध्यमांसमोर स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, डॉक्टर मंडळी आपलीच आहे. तसेच जेव्हा ते अडचणीत आले तेव्हा मी व्यक्तीशा त्यांना मदत केली आहे. भरमसाठ बिलांबाबत जेव्हा आंदोलने झालीत तेव्हा डॉक्टरांच्या प्रकरणात मी मध्यस्थी केली. त्यातही डॉक्टरांची बाजू घेतली, त्यामुळे माझ्याकडून डॉक्टरांचा कोणताही अपमान झाला नाही आहे. असे संजय राऊत म्हणाले आहेत. 

विरोधक आणि राजकारणी मंडळी मोहीम चालवत असतील तर ते चुकीचे आहे. बोलण्याच्या ओघात मी कोणत्याही प्रकारे डॉक्टरांचा अपमान केला नाही. माझ्याकडून बोलताना कोटी झाली, त्यामुळे याचा कोणी गैरसमज करु नये. मला काही राजकारणी माफी मागायला सांगत आहे. परंतु मी कोणाचाही अपमान केलाच नाही. असेही संजय राऊत म्हणाले आहेत. 

तसेच पुढे संजय राऊत म्हणाले की, आम्ही डॉक्टरांचे सदैव संरक्षण केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लंडनला जाऊन डॉक्टरांचा अपमान केला. आमचे डॉक्टर जास्त पैसे घेतात. त्यावर तिथल्या डॉक्टरांनी निषेध केला. मग मोदींचा का नाही निषेध करत असा त्यांनी पलटवार केला आहे. तसेच माझ्या मनात डॉक्टरांच्या बाबत सन्मान आहे. मी कंम्पाउंडरचा सन्मान केला म्हणून एका पक्षाने मोठी भूमिका घेण्याची आवश्यकता नाही. असे संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.