अनंत गीतेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले? : वाचा सविस्तर

अनंत गीते यांच्या वक्तव्याचा राज्य सरकारशी काही संबंध नाही. ते त्यांचं वयक्तिक वक्तव्य आहे, असंही राऊत म्हणाले आहेत. असं संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

    नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेना नेते अनंत गीते हे राजकारणात पुन्हा सक्रिय झाले आहेत. सध्या त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापलेलं दिसतंय. दरम्यान त्यावर आता अनंत गीते यांच्या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    संजय राऊत काय म्हणाले?

    शरद पवार हे देशाचे नेते आहेत. महाराष्ट्रात तीन पक्ष एकत्र असून शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेस यांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केलं आहे. महाराष्ट्रातील हे सरकार पाच वर्ष टीकेल. कारण या सरकारला संपूर्ण महाराष्ट्राची मान्यता आहे, तसेचं अनंत गीते यांच्या वक्तव्याचा राज्य सरकारशी काही संबंध नाही. ते त्यांचं वयक्तिक वक्तव्य आहे, असंही राऊत म्हणाले आहेत. असं संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

    अनंत गीते नेमकं काय म्हणाले होते?

    राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आमचे नेते होऊ शकत नाहीत, महाविकास आघाडी सरकार ही केवळ सत्तेसाठी केलेली तडजोड आहे, असं अनंत गीते यांनी रायगडमध्ये बोलताना म्हटलं होतं. तसेचं गीते यांनी पुढे म्हटलं होतं की, शिवसेना आणि काँग्रेस हे कधीच एक होऊ शकत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्मच मुळात काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालाय. त्यांच्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. आता याला पुढे काय वळण येईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.