कोणी कुणाच्या थोबाडीत मारत नाही; चंद्रकांत पाटलांच्या टीकेला संजय राऊतांचे उत्तर

भाजपा प्रदेशाध्यक्ष यांनी महाविकास आघाडी सरकारबाबत भाष्य करताना हा गौप्यस्फोट केला होता. मित्र असलेला एक वरिष्ठ कॅबिनेट मंत्री मला म्हणाला की, आम्हाला इतकी अनपेक्षितपणे सत्ता मिळाली आहे. कल्पना नसताना. आम्ही गृहित धरले होते की, पुढचे पाच-पंचवीस वर्ष सत्ता नाही. तेवढ्यात अनपेक्षितपणे सत्ता मिळाली. त्यामुळे उद्या भर चौकात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आमच्या थोबाडीत जरी मारली, तरीसुद्धा आम्ही सरकारमधून बाहेर पडणार नाही.

    मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कानाखाली मारली तरी सत्ता सोडणार नाही, असे महाविकास आघाडी सरकारमधील एका मंत्र्याने मला सांगितले होते, असा खळबळजनक गौप्यस्फोट भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला होता. पाटील यांच्या या वक्तव्यांवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले. आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पाटील यांचा आपल्या खास शैलीत समाचार घेतला. पाटलांनी हवेत गोळीबार करू नये, त्यांना अफवा पसरवण्याची सवयच आहे, असा टोला राऊत यांनी लगावला आहे.

    भाजपा प्रदेशाध्यक्ष यांनी महाविकास आघाडी सरकारबाबत भाष्य करताना हा गौप्यस्फोट केला होता. मित्र असलेला एक वरिष्ठ कॅबिनेट मंत्री मला म्हणाला की, आम्हाला इतकी अनपेक्षितपणे सत्ता मिळाली आहे. कल्पना नसताना. आम्ही गृहित धरले होते की, पुढचे पाच-पंचवीस वर्ष सत्ता नाही. तेवढ्यात अनपेक्षितपणे सत्ता मिळाली. त्यामुळे उद्या भर चौकात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आमच्या थोबाडीत जरी मारली, तरीसुद्धा आम्ही सरकारमधून बाहेर पडणार नाही.

    शरद पवार, काँग्रेसचे अध्यक्ष नुसते बोलत आहेत. पण थोबाडीत मारली तर आम्ही शांत राहू कारण एवढी अनपेक्षितपणे मिळालेली सत्ता आम्ही घालवू कशी? असे त्या ज्येष्ठ मंत्र्याने मैत्रीच्या नात्याने मला सांगितले, असे पाटील म्हणाले होते.

    एक मंत्री कोण? ते सांगा. असा हवेत गोळीबार करून चालणार नाही. तसेच कोणी कुणाच्या थोबाडीत मारत नाही. चंद्रकांत पाटील किंवा इतर कुणी अशा अफवा पसरवत असतात. यातून त्यांना आनंद मिळतो. म्हणून त्यांनी त्याचा आनंद घ्यावा. मात्र महाविकास आघाडीचे सरकार तीन वर्षे चालणार आहे. त्यानंतर महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत येईल. याविषयीदेखील त्यांनी निश्चिंत राहावे.

    - संजय राऊत, खासदार, शिवसेना