चपला घालून महाराजांना कुणी हार घालत नाही; नारायण राणेंच्या टीकेला संजय राऊत यांचे प्रत्युत्तर

भाजपला महाराजांचा अवमान आवडला असेल तर ठिक आहे. आम्हाला नाही चांगले वाटले म्हणून आम्ही त्यावर बोललो. चपला घालून महाराजांना कुणी हार घालत नाही. हा आमचा रितीरिवाज आणि परंपरा आहे. महाराजांबद्दलचा आदर आहे अश्या शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टिकास्त्र सोडले आहे. राऊत भुवनेश्वरचा दौरा अर्धवट टाकून मुंबईत आले आहेत. यावेळी त्यांनी विमानतळावरच माध्यामांशी संवाद साधला

  मुंबई : मुख्यमंत्र्यांविरोधात करण्यात आलेल्या तक्रारीवर खा संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.  कुणी काय म्हटले मला माहीत नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विधानाला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. तोपर्यंत तुम्ही झोपले होते का? तेव्हा ते विधान आक्षेपार्ह वाटले नाही का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ते विधान का केले? छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला म्हणून मुख्यमंत्र्यांनी ते विधान केले.

  भाजपला महाराजांचा अवमान आवडला असेल तर ठिक आहे. आम्हाला नाही चांगले वाटले म्हणून आम्ही त्यावर बोललो. चपला घालून महाराजांना कुणी हार घालत नाही. हा आमचा रितीरिवाज आणि परंपरा आहे. महाराजांबद्दलचा आदर आहे अश्या शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टिकास्त्र सोडले आहे. राऊत भुवनेश्वरचा दौरा अर्धवट टाकून मुंबईत आले आहेत. यावेळी त्यांनी विमानतळावरच माध्यामांशी संवाद साधला.

  आम्ही आणि मोदी पाहून घेऊ

  महाराष्ट्राचा पश्चिम बंगाल होऊ देणार नाही, असे विधान नारायण राणे यांनी केले त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. काय करायचे आणि काय नाही हे ठरवणारे ते कोण? आम्ही आणि मोदी पाहून घेऊ काय करायचे ते. कोणीही काहीही विधान करत असेल तर त्यावर बोललेच पाहिजे असे नाही. केवळ एक कॅबिनेट मंत्री म्हणजे सरकार नाही. आम्हाला बोलायचे असेल तर आम्ही नरेंद्र मोदींशी बोलू. अमित शहांशी बोलू. राष्ट्रपतींशी बोलू, असे सांगतानाच कुणाच्याही विधानावर प्रतिक्रिया दिली पाहिजे असे नाही. आमच्याकडे कामे आहेत, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

  बाळासाहेबांनी सर्वोच्च पदावर बसवले

  गँगस्टर होतो तर मुख्यमंत्री का केले? या राणेंच्या विधानाचाही राऊत यांनी समाचार घेतला. बाळासाहेबांचे उपकार मानले पाहिजे. शिवसेनेचे उपकार मानले पाहिजे. आमच्या सारख्या सामान्य माणसाला बाळासाहेबांनी सर्वोच्च पदावर बसवले आहे, असेही राऊत म्हणाले मुख्यमंत्र्यांविरोधात करण्यात आलेल्या तक्रारीवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

  read_also content=”मुंबईतील कोरोना घालविण्यासाठी BMC चा जबरदस्त प्लान; नागरिकांचा बॉडी मास इंडेक्स तपासला जाणार~https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/corporation-to-conduct-survey-of-non-communicable-diseases-in-mumbai-citizens-body-mass-index-will-be-checked-nrvk-171732/”]