sanjay raut

औरंगाबादच्या नामांतराला काँग्रेस पक्षाकडून होणाऱ्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर राऊत यांचा पवित्रा ठाम असल्याचे दिसत आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना अहमदनगरच्या नामांतराच्या मागणीविषयी विचारणा करण्यात आली. तेव्हा राऊत यांनी अशा मागण्या होतच असतात. पण औरंगाबादचं संभाजीनगर होणार हे नक्की, असे वक्तव्य केलं.

    मुंबई: औरंगाबादच्या नामांतरावरून महाविकास आघाडीत चुरस पहायला मिळत आहे. दरम्यान, कोणत्याही परिस्थितीत औरंगाबादचं संभाजीनगर होणार हे नक्की, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. परंतु या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीत पुन्हा एकदा कुरबुरी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

    औरंगाबादच्या नामांतराला काँग्रेस पक्षाकडून होणाऱ्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर राऊत यांचा पवित्रा ठाम असल्याचे दिसत आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना अहमदनगरच्या नामांतराच्या मागणीविषयी विचारणा करण्यात आली. तेव्हा राऊत यांनी अशा मागण्या होतच असतात. पण औरंगाबादचं संभाजीनगर होणार हे नक्की, असे वक्तव्य केलं.

    दरम्यान, काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांकडून औरंगाबादच्या नामांतरावरून शिवसेनेविरोधात उघडपणे भूमिका घेण्यात आली होती. तसेच शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामन्यातून देखील काँग्रेस नेत्यांना चिमटे काढण्यात आले होते. परंतु संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडीत खळबळ उडणार असल्याचे चित्र दिसत आहे.