पत्नीला ईडीची नोटीस; संजय राऊत म्हणतात, आ देखे जरा किसमे कितना है दम…

मुंबई : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत ( sanjay raut ) यांची पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावल्याचे वृत्त आहे. या वृत्तनंतर संजय राऊत यांनी केलेले एक ट्विट सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. कुणात किती दम आहे, हे बघू असं राऊत यांनी हिंदी गाण्याच्या ओळी ट्विट करत म्हटलं आहे.

‘आ देखे जरा किसमे कितना है दम, जमके रखना कदम मेरे साथीया…’ अशा बॉलिवूडमधील एका लोकप्रिय गाण्याचा ओळी संजय राऊत यांनी ट्विट केल्या आहेत. या ट्विटच्या माध्यातून राऊत यांनी केंद्रातील सत्ताधारी भाजपवर निशाणा आहे.

पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावली असून २९ तारखेला वर्षा राऊत यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी ही नोटीस देण्यात आली असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.