रुग्णसेवा व्यवस्थेत सुसूत्रता हवी – संविधान प्रचारक संयोजन गटाकडून मागणी

मुंबई:कोव्हिड संसर्ग सुरु झाल्यापासून सुरु झालेल्या उपाययोजनांबाबात रुग्ण व त्यांचे नातेवाईक सतत तक्रार करत आहेत. कोरोना रुग्णांना योग्य रुग्णालय मिळण्यापासून ते व्हेंटीलेटर उपलब्धतेपर्यंत

मुंबई: कोव्हिड संसर्ग सुरु झाल्यापासून सुरु झालेल्या उपाययोजनांबाबात रुग्ण व त्यांचे नातेवाईक सतत तक्रार करत आहेत. कोरोना रुग्णांना योग्य रुग्णालय मिळण्यापासून ते व्हेंटीलेटर उपलब्धतेपर्यंत सर्वच तक्रारी मागील काही महिन्यांपासून सतत नागरिक करत आहेत. अशावेळी आरोग्य विभाग रुग्णासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असताना  कोव्हिड नॉन कोव्हिड रुग्णांच्या रुग्णसेवेत सुसूत्रता हवी अस‌ल्याची मागणी संविधान प्रचारक संयोजन गटाकडून करण्यात आली आहे.

सध्या मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कोव्हिड संसर्गित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. कोव्हिड तसेच नॉन कोव्हिड रुग्णांसाठी बेड, व्हेंटीलेटर, आयसीयू बेड उपलब्ध करुन दिले जात आहेत. मात्र तरीही रुग्णांना ही माहीती उपलब्ध होत नसल्याचे संविधान प्रचारक संयोजन गटाकडून सांगण्यात आले. कोव्हिड तसेच नॉन कोव्हिड रुग्णांसाठी किती रुग्णालये,‌ किती बेड, व्हेंटीलेटर संख्या, आयसीयू बेडची माहीती नसल्याने रुग्ण चितिंत होवून फिरत असल्याचे डॉ. अभिजीत मोरे यांनी सांगितले.तर दुसरीकडे, १९१६ ही देण्यात आलेली हेल्पलाईन निरोपयोगी ठरत असल्याच्या तक्रारी संविधान प्रचारक संयोजन गटाकडे येत असल्याचे सांगण्यात आले. रुग्णालये रुग्णांनी भरली असून,  खाट उपलब्ध‌ होण्यास ६ ते ७ तास लागतात. यातून कोव्हिड नॉनकोव्हिड रुग्ण उपचाराअभावी दगावत असल्याच्या घटना घडत आहेत.सरकारने खासगी रुग्णालयांमध्ये ८० टक्के खाटा अधिग्रहण केल्या तरीही खाट, व्हेंटीलेटर मिळणे अवघड होत अाहे. सर्व उपाय योजना असल्या तरीही यातील अंमलबजावणी करण्यास सुसुत्रता हवी असल्याची सुचना संविधान प्रचारक संयोजन गटाकडून करण्यात आली आहे.

मागण्या 

–  मुंबई-ठाणे-नवी मुंबईत माहीती देणारे वॉर रुम उभारावेत. यातून रुग्णालय, खाटा, आयसीयू बेड, व्हेंटीलेटर उपलब्धतेची माहीती द्यावी

– १९१६ हेल्पलाईनमधील मर्यादा ओळखून यंत्रणा उभी करावी

– उपलब्धतेची माहीती अॅप, मोबाईल वर उपलब्ध करावी.

– इ-टोकन, ऑनलाईन बुकींग सारखी यंत्रणा उभारावी.