घोटाळेबाज सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर जेलचे पाहुणे होणारच; किरीट सोमय्यांचा इशारा

मदार प्रताप सरनाईक यांना जेलमध्ये जाण्याची भीती वाटत असल्याने त्यांनी हे पत्र लिहिल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. “शिवेसेनाचे आमदार प्रताप सरनाईक जेलच्या भीतीने चिंताग्रस्त दिसत आहेत आणि आता सरनाईकनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भाजपा यांच्याशी हातमिळवणी करावी अशी विनवणी केली आहे. सर्व घोटाळेबाज प्रताप सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर जेलचे पाहुणे होणारच”, असे सोमय्या यांनी म्हटले आहे.

    मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहलेल्या पत्रामुळं राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. प्रताप सरनाईक यांनी पंतप्रधान मोदी व भाजपशी पुन्हा जुळवून घ्या अशी विनंती पत्रात केली आहे. तर एकीकडे महाविकास आघाडीत घटक पक्ष असलेले काँग्रेस- राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, महाविकासआघाडीसाठी सर्वाधिक अडचणीच्या वाढल्या आहेत.

    सोमय्या काय म्हणाले ?

    या दरम्यान भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. आमदार प्रताप सरनाईक यांना जेलमध्ये जाण्याची भीती वाटत असल्याने त्यांनी हे पत्र लिहिल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. “शिवेसेनाचे आमदार प्रताप सरनाईक जेलच्या भीतीने चिंताग्रस्त दिसत आहेत आणि आता सरनाईकनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भाजपा यांच्याशी हातमिळवणी करावी अशी विनवणी केली आहे. सर्व घोटाळेबाज प्रताप सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर जेलचे पाहुणे होणारच”, असे सोमय्या यांनी म्हटले आहे.

    प्रताप सरनाईक यांनी १० जूनला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहलं होतं. या पत्रात त्यांनी ‘सत्तेत असलेले राष्ट्रवादी-काँग्रेस आपलेच कार्यकर्ते फोडत आहेत. आपला पक्ष कमकुवत होत असेल तर मोदींशी जुळवून घेतलेले बरे, असं म्हटलं आहे. सरनाईक यांच्या ‘लेटरबॉम्बमुळे आता अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.