मुंबईतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंदच राहणार; परिस्थिती पाहून शाळा सुरु करण्याचे शिक्षणमंत्र्यांचे आदेश  

दिवाळीनंतर देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसत आहे. दिल्लीत पून्हा लॉकडाऊन तर गुजरातमध्ये संचारबंदी लागू झाली आहे. यातच महाराष्ट्र सरकारने शाळा सुरु करण्याचा घाट घातला आहे. खबरदारी म्हणून मुंबईतील सर्व शाळा ३१ डिसेंबर पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर, परिस्थीती पाहून इतर ठिकाणी शाळा सुरु करण्याचे आदेश शिक्षण मंत्र्यांनी दिले आहेत.

मुंबई : सोमवारपासून राज्यातील शाळा सुरु करण्याती तयारी राज्य सरकारने सुरु केली आहे. मात्र, पून्हा रुग्ण संख्या वाढू लागल्याने मुंबईतील सर्व महापालिका तसेच खाजगी शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी दिले आहेत. तर, परिस्थछिती पाहून शाळा सुरु करण्याबाबात स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा असे आदेश शिक्षणमंत्री व्रषा गायकवाड यांना दिले आहेत.

दिवाळीनंतर  (Diwali) शाळा सुरु करण्याचे आदेश शिक्षणमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरु करण्याच्या अनुषंगाने तयारी सुरु आहे. मात्र, दिवनाळीनंतर पून्हा रुग्ण संख्या वाढू लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. खबरदारी म्हणून मुंबई मपाहालिका क्षेत्रातील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. येत्या सोमवारपासून राज्यात शाळा सुरु होणार असल्या तरी शाळा सुरू करणे बंधनकारक नाही. त्यामुळे राज्यातील विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करुन स्थानिक पातळीवर कोरोनाची सथिती काय आहे पाहून याबाबत निर्णय घ्यावा असे आदेश त्यांनी दिले आहेत. शाळा सुरु करताना पालकांची संमती गरजेची असून विद्यार्थी शाळेत आलेच पाहिजे, असं बंधन नसणार आहे. शाळा सुरू झाल्या तरी ऑनलाईन शिक्षण बंद नसेल त्यामुळे विद्यार्थ्यांच नुकसान होणार नाही. शाळेत विद्यार्थी आले नाही तरी त्यांना उपस्थिती मार्क्स यावर परिणाम नाही, असंही शिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.