corona screening

गत वर्षी गुजरात, राजस्थान, दिल्ली, गाेवा, केरळ या राज्यात काेराेना रुग्णसंख्या वाढल्याचे निदर्शनास आल्यानंतर पालिका प्रशासनाने रेल्वे, विमान मार्गाने मुंबईत येणाऱ्या नागरिकांची काेराेना चाचणी करण्याचा निर्णय घेतला हाेता. नुकताच पालिका प्रशासनाने केरळमधून मुंबईत दाखल हाेणाऱ्या प्रवाशांची काेराेना तपासणी केली जात आहे.

  नीता परब

  मुंबई: मुंबईत कोराेना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे समाेर येत आहे. वाढती रुग्णसंख्या आटाेक्यात आणण्यासाठी आता पालिका आराेग्य विभाग नानाविध प्रयत्न करत आहेत यात काेराेना चाचणीमध्येही वाढ केली जात आहे. तसेच गुजरात, राजस्थान, दिल्ली, गाेवा, केरळ आदी ठिकाणांहून महामार्गाने अनेक प्रवासी मुंबईत प्रवेश करत असतात, ज्यामुळे रुग्णसंख्येत वाढ हाेत असल्याचे आढळून आले आहे. याच पार्श्वभूमीवर, आता पालिका प्रशासनाने मुंबईतील असलेले मुख्य प्रवेशद्वारांवर स्क्रिनिंग पाॅईंट सुरु करण्याचा विचार करत आहे. हे स्क्रिनिंग पाॅईंट ऑक्ट्राॅय नाक्यावर करण्याचा पालिका प्रशासन विचार करत आहे.

  गत वर्षी गुजरात, राजस्थान, दिल्ली, गाेवा, केरळ या राज्यात काेराेना रुग्णसंख्या वाढल्याचे निदर्शनास आल्यानंतर पालिका प्रशासनाने रेल्वे, विमान मार्गाने मुंबईत येणाऱ्या नागरिकांची काेराेना चाचणी करण्याचा निर्णय घेतला हाेता. नुकताच पालिका प्रशासनाने केरळमधून मुंबईत दाखल हाेणाऱ्या प्रवाशांची काेराेना तपासणी केली जात आहे. मुंबईतील प्रमुख रेल्वे स्टेश व विमानतळावर संबंधित पाच राज्यातून येणाऱ्या प्रवाशांची काेराेना चाचणी करण्यास आराेग्य विभागाने सुरुवात केली आहे. या चाचणीपासून सुटका करण्याकरीता बरेच प्रवासी महामार्गाने मुंबईत दाखल हाेतात. ज्यामुळे पालिका आराेग्य विभागासमाेर एक नवं आव्हानं उभं राहिलं आहे.

  मुंबईच्या प्रवेशद्वारावर स्क्रिनिंग

  कॅम्प उभारले जाणार

  पालिका प्रशासनाने गुजरात, राजस्थान, दिल्ली, गाेवा, केरळ या पाच राज्यातून मुंबईत दाखल हाेणाऱ्या प्रवाशांसाठी मुंबईच्या प्रवेशद्वारावर स्क्रिनिंग कॅम्प उभारण्याचा विचार करत असल्याचे पालिका कार्यकारी आराेग्य अधिकारी डाॅ. मंगला गाेमारे यांनी सांगितले.

  येथे सुरु हाेणार कॅम्प

  मुंबईतील बरेच ऑक्ट्राॅय नाक्यांची जागा रिक्त आहे. या जागेवर हे स्क्रिनिंग पाॅंईट असणार आहेत. यात मानखुर्द, ऐरोली, मुलुंड (पूर्व), एलबीएस मार्ग,मुलुंड, (पश्चिम) आणि दहिसर येथे स्क्रिनिंग पॉईंट असणार आहेत. यामुळे गुजरात, केरळ, गाेवा, राजस्थान, दिल्ली येथून महामार्गाने येणाऱ्या प्रवाशांची चाचणी केल्याने काेराेना चाचणीतही वाढ हाेणार आहे.