मूर्तिकारांना शासनाच्या निर्णयाची प्रतीक्षा, यंदाही गणेशाेत्सव साजरा करणा-यांवर निर्बंध

गणेशोत्सवाला फक्त पन्नास दिवस उरले आहेत. दरवर्षी जुलैअखेरपर्यंत गणेशमूर्तीं कार्यशाळांमध्ये सजलेल्या असतात. राज्य सरकारने केवळ चार फुटांपर्यंतच्या गणेश मूर्तींना परवानगी दिल्याने पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे गणेशोत्सवमंडळे व मूर्तीकार राज्य सरकारकडे उंच मूर्तींच्या परवानगीसाठी विनंती करीत आहेत. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सेनाभवन येथे बैठक घेतली होती.

    मुंबई – कोरोनाच्या संकटामुळे यंदाही गणेशाेत्सव साजरा करणा-यांवर निर्बंध आले आहेत. येत्या गणेशोत्सवातही मूर्तीच्या उंचीवर मर्यादा असणार आहे. मात्र शासन निर्णयात बदल होईल, या अपेक्षेने मूर्तीकारांकडे अजूनही मूर्तींची नोंदणी झालेली नाही. त्यामुळे नोंदणी कधी होणार याची चिंता मूर्तीकारांना वाटत आहे. त्यामुळे मूर्तिकार शासनाच्या निर्णयाची प्रतीक्षा आहेत.

    गणेशोत्सवाला फक्त पन्नास दिवस उरले आहेत. दरवर्षी जुलैअखेरपर्यंत गणेशमूर्तीं कार्यशाळांमध्ये सजलेल्या असतात. राज्य सरकारने केवळ चार फुटांपर्यंतच्या गणेश मूर्तींना परवानगी दिल्याने पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे गणेशोत्सवमंडळे व मूर्तीकार राज्य सरकारकडे उंच मूर्तींच्या परवानगीसाठी विनंती करीत आहेत. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सेनाभवन येथे बैठक घेतली होती.

    त्या बैठकीत सकारात्मक प्रयत्न करू, तसेच आठ ते दहा दिवसात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊ, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र याबाबत अद्याप बैठक झालेली नसल्याने कोणताही तोडगा निघालेला नाही. कोरोनाने मुंबईत शिरकाव केल्यानंतर उत्सवावर मर्यादा आल्याने हजारो मूर्तिकार आणि त्यांच्या हाताखाली काम करणारे कारागिरांना तोटा सहन करावा लागत आहे. यंदाही तशी वेळ आली तर मूर्तिकारांना मोठा आर्थिक फटका बसेल त्यामुळे सरकारने लवकर तोडगा काढावा, अशी मागणी मंडळ व मूर्तीकारांनी केला आहे.