राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक

तब्बल दहा तासांच्या चौकशीनंतर अल्पसंख्याक व कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना एनसीबीने बुधवारी रात्री उशीरा अटक केली. त्यानंतर गुरुवारी सकाळपासूनच समीर खान यांच्या घराची एनसीबीकडून झाडाझडती सुरु आहे. त्यांच्या घरातुन काही पुरावे मिळातात का हे चौकशीनंतर समोर येईल.

मुंबई : तब्बल दहा तासांच्या चौकशीनंतर अल्पसंख्याक व कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना एनसीबीने बुधवारी रात्री उशीरा अटक केली. त्यानंतर गुरुवारी सकाळपासूनच समीर खान यांच्या घराची एनसीबीकडून झाडाझडती सुरु आहे. त्यांच्या घरातुन काही पुरावे मिळातात का हे चौकशीनंतर समोर येईल.

समीरच्या घरात सर्च ऑपरेशन सुरु आहे. ब्रिटीश नागरिक आणि ड्रग सप्लायर करण सजनानी प्रकरणात समीरला अटक झाली आहे. एनसीबीच्या सूत्रांच्या माहितीनुसार, करण सजनानी आणि समीर या दोघांमधील ड्रग्ज बाबतटचे चॅट आणि पैशांची देवाण-घेवाणचे पुरावे सापडले आहेत.

एनसीबीने शनिवारी एका ब्रिटिश नागरिकासह तीन लोकांना अटक केली. या तिघांकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त करण्यात आलं आहे. या तिघांमध्ये ब्रिटिश नागरिक करण सजनानीसह दिया मिर्जाची एक्स मॅनेजर राहिला फर्निचरवाला आणि तिची बहिण शाईस्ता फर्निचरवाला यांचा समावेश आहे. त्याच्याकडून अमेरिकेतून मागवण्यात आलेला, अतिशय महाग खास प्रकारचा गांजा जप्त करण्यात आला आहे.
मुच्छड पानवाला अटक करण्यात आलेल्या राहिला फर्निचरवाला हिच्या संपर्कात होता.

मुच्छड पानवालाच्या चौकशीनंतर एनसीबीने समीर खान यांना समन्स बजावलाय. तपासादरम्यान करण सजनानी आणि समीर खान यांच्यात गुगल पेच्या माध्यमातून २० हजारांचा व्यवहार झाला असल्याचं समोर आलं. ड्रग्जसाठी हा व्यवहार झाल्याचा एनसीबीला संशय आहे.