आरटीई प्रवेशाची दुसरी फेरी;  मुंबईत ११९८ विद्यार्थ्यांना प्रवेश

मुंबईतील डीवायडी आणि पालिका अशा मिळून ३५२ शाळांत ६ हजार ४६३ जागा आहेत. त्या जागांसाठी १२ हजार ९११ बालकांच्या प्रवेशासाठी पालकांनी अर्ज दाखल केले होते. पहिल्या सोडतीत प्रवेश मिळालेल्यांना ४ हजार ९८५ पैकी ३ हजार १०८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. बऱ्याच दिवसानतर आरटीईच्या दुसऱ्या फेरीच्या प्रवेशाची सोडत जाहीर केली आहे.

    मुंबई : वंचित व दुर्बल घटकांसाठी राखीव असलेल्या २५ टक्के जागांवर प्रवेश देण्यासाठी बुधवारी दुसरी सोडत जाहीर करण्यात आली. यामध्ये या फेरीत १ हजार १९८ विद्यार्थी प्रवेश देण्यात आले आहे.

    मुंबईतील डीवायडी आणि पालिका अशा मिळून ३५२ शाळांत ६ हजार ४६३ जागा आहेत. त्या जागांसाठी १२ हजार ९११ बालकांच्या प्रवेशासाठी पालकांनी अर्ज दाखल केले होते. पहिल्या सोडतीत प्रवेश मिळालेल्यांना ४ हजार ९८५ पैकी ३ हजार १०८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. बऱ्याच दिवसानतर आरटीईच्या दुसऱ्या फेरीच्या प्रवेशाची सोडत जाहीर केली आहे.

    मुंबईतील आरटीई अंतर्गत कोट्यातील शाळातील निम्या जागा बाकी आहेत. अर्ज मोठ्या संख्येने आले आहेत आणि जागा कमी असल्याचे चित्र जरी आहे.पण अद्याप पहिल्या फेरीत पालकांनी प्रवेश घेण्यासाठी प्रतिसाद दिला नसल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे.

    दुसऱ्या यादीत १ हजार १९८ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले आहेत. ९०२ एससी शाळांतील जागावर तर २९६ प्रवेश इतर केंद्रीय मंडळाच्या शाळांतील जागावर प्रवेश देण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांना या सोडतीत प्रवेश मिळाले आहेत. त्या पालकांना २५ ऑगस्टपर्यंत शाळेत जावून प्रवेश घ्यावा लागणार आहे. शाळेत प्रवेश घेण्यासाठी सर्व पालकांनी गर्दी करू नये .तसेच प्रवेश घेण्यासाठी जाताना विद्यार्थीना आपल्या बरोबर नेऊ नये, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. आहे.

    प्रवेश घेण्यासाठी शाळेकडून नोंदणी केलेल्या मोबाइलवर एसएमएसद्वारा कळविण्यात येईल .परंतु पालकांनी एसएसएमवर अवलंबून न राहता आरटीई पोर्टल वरील अर्जाची स्थिती या टॅब वर क्लीक करून प्रवेशाची माहिती घ्यावी असे शिक्षण विभागाने म्हटले आहे.