BJPs orange flag is fake Sanjay Rauts harsh criticism

शिवसेना खासदार संजय राऊत(sajay raut) यांच्यावर आज यशस्वी अँजिओप्लास्टी(angioplasty) सर्जरी करण्यात आली. तब्बल सव्वा तास ही सर्जरी झाली असल्याचे सांगण्यात आले.

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत(sajay raut) यांच्यावर आज यशस्वी अँजिओप्लास्टी(angioplasty) सर्जरी करण्यात आली. तब्बल सव्वा तास ही सर्जरी झाली असल्याचे सांगण्यात आले. सध्या संजय राऊत आयसीयूमध्ये आहेत. सध्या राऊत यांना डाॅक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

संजय राऊत यांच्यावर दुसऱ्यांदा अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. हृदयासंबंधी त्रास पुन्हा सुरू झाल्यानंतर बुधवारी दुपारी त्यांना मुंबईतील लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. हृदयरोगतज्ज्ञ डॉ मॅथ्यू आणि डॉ अजित मेनन यांच्या मार्गदर्शनाखाली संजय राऊत यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात संजय राऊत यांच्यावर हृदयात दोन स्टेन घालण्यात आल्या होत्या. त्यानंतर आणखी स्टेन टाकावे लागणार होते. त्यासाठी एप्रिल २०२० मध्ये शस्त्रक्रिया करण्यात येणार हाेती. मात्र काेरोनामुळे ही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली हाेती.

दरम्यान, संजय राऊत यांनी गेल्या आठवड्यात शनिवारी लिलावती रुग्णालयात आरोग्य तपासणी केली होती. त्यावेळी त्यांना ताण आणि थकवा जाणवत होता. यामुळे लिलावती रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. त्यानंतर त्यांच्यावर दुसऱ्यांदा अँजिओप्लास्टी सर्जरी करण्यात आली.