sachin waze

मुंबई पोलीस(Mumbai Police) दलातून बडतर्फ अधिकारी सचिन वाझे(Summons To SachinWaze)  याला न्या चांदीवाल आयोगाने दुसऱ्यांदा समन्स जारी केले आहे.

  मुंबई: अँटिलिया(Antilia) स्फोटक आणि मनसुख हिरेन(Mansukh Hiren Case) मृत्यूप्रकरणी मुंबई पोलीस(Mumbai Police) दलातून बडतर्फ अधिकारी सचिन वाझे(Summons To SachinWaze)  याला न्या. चांदीवाल आयोगाने दुसऱ्यांदा समन्स जारी केले आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या शंभर कोटीच्या कथित खंडणी आणि लाचखोरीच्या आरोपांची चौकशी करताना आयोगाने हे समन्स जारी केले आहे.

  निवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणाची सध्या चौकशी सुरु आहे. याप्रकरणी वाझे याला प्रतिज्ञापत्र सादर करण्याबाबत हे समन्स जारी करण्यात आले आहे.

  उच्च न्यायालयाचे सीबीआय चौकशीचे आदेश
  मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात गंभीर आरोप करत एक पत्र लिहिले होते. या प्रकरणात अनिल देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. सिंग यांनी याबाबत दाखल केलेल्या याचिकेची दखल घेत उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. राज्य सरकारने या आरोपांची समांतर चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधिश चांदिवाल यांचा आयोग गठीत केला आहे.

  प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश
  न्या. चांदीवाल यांनी ३० मे रोजी पाच जणांना समन्स बजावून या आरोपांच्या अनुषंगाने ११ जूनपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार, सचिन वाझेलाही प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक होते. मात्र वाझे सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याने प्रतिज्ञापत्र सादर अद्याप सादर झाले नाही. त्यामुळे आयोगाने वाझेंना दुसऱ्यांदा समन्स बजावले आहे.

  या प्रकरणात ज्यांच्यावर मुख्य आरोप आहेत, ते म्हणजे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आयोगापुढे प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी वेळ मागणारा अर्ज यापूर्वीच सादर केलेला आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर गाडीमध्ये आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेला एनआयएने अटक केली आहे. याप्रकरणी एनआयए सचिन वाझे यांची चौकशी करत आहे. तर मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपासही एनआयए करत आहे.