नियमांची गोष्ट कोण करतंय? भातखळकरजी आपल्या पायाखाली काय जळतंय ते बघा : व्टिट करत रोहित पवारांचे भाजप नेत्यांना प्रत्यूत्तर

कोविड सेंटरमध्ये नाचल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना भाजपच्या नेत्यांनी वडिलोपार्जित कंपन्यांसारखे सरकार चालवू नका. असे म्हणत लक्ष्य केले होते. भाजप नेते अतुल भातखळकर यांनीही नियम सगळ्यांना सारखे हवेत, असे म्हणत पवार यांच्यावर टिका केली होती. 

    मुंबई : राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी भाजप नेते आ अतुल भातखळकर यांना व्टिट करत नाकाने कांदे सोलणे बंद करा अश्या शब्दात प्रत्युत्तर दिले आहे.

    तन्मय फडणवीस याने लस टोचून घेतली

    रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या तन्मय फडणवीस याचा कोरोना लस घेतानाचा फोटो ट्विट केला आहे. ४५ वर्षांखालील नागरिकांना कोरोना लस घेण्याची परवानगी नसताना तन्मय फडणवीस याने लस टोचून घेतली होती.

    त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि भाजप अडचणीत आला होता. याच मुद्द्यावर रोहित पवार यांनी अतुल भातखळकर यांना नाकाने कांदे सोलू नका नियम त्यावेळी सुध्दा होते तेंव्हा का नाही पाळले असा प्रतिसवाल केला आहे.

    नेहमीच नाकाने कांदे सोलू नका

    कोविड सेंटरमध्ये नाचल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना भाजपच्या नेत्यांनी वडिलोपार्जित कंपन्यांसारखे सरकार चालवू नका. असे म्हणत लक्ष्य केले होते. भाजप नेते अतुल भातखळकर यांनीही नियम सगळ्यांना सारखे हवेत, असे म्हणत पवार यांच्यावर टिका केली होती.

    व्टिट करत पवार यांनी म्हटले आहे की, नियमांची गोष्ट कोण करतंय? भातखळकरजी आपल्या पायाखाली काय जळतंय ते बघा आधी. उगीच कशाला नेहमीच नाकाने कांदे सोलण्याचा प्रयत्न करता? यामुळं स्वतःचेच जास्त वांधे होतील, असा पलटवार रोहित पवार यांनी केला.