घर बसल्या डॉक्टरांची मदत घ्या; भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशतर्फे राज्यव्यापी डॉक्टर सहाय्यता हेल्पलाइन

राज्यभरात कोरोनाच्या संकट काळात भारतीय जनता युवा मोर्चाचे सर्वच कार्यकर्ते दिवस-रात्र सेवाकार्य करून नागरिकांना मदत करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कोव्हिड ची सौम्य लक्षणे असणाऱ्या नागरिकांना घरबसल्या डॉक्टरांचा सल्ला घेता यावा यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने  ०८०६८१७३२८६   या राज्यव्यापी डॉक्टर हेल्पलाइनचा शुभारंभ करण्यात आलेला आहे.

    मुंबई : राज्यभरात कोरोनाच्या संकट काळात भारतीय जनता युवा मोर्चाचे सर्वच कार्यकर्ते दिवस-रात्र सेवाकार्य करून नागरिकांना मदत करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कोव्हिड ची सौम्य लक्षणे असणाऱ्या नागरिकांना घरबसल्या डॉक्टरांचा सल्ला घेता यावा यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने  ०८०६८१७३२८६   या राज्यव्यापी डॉक्टर हेल्पलाइनचा शुभारंभ करण्यात आलेला आहे.

    सौम्य लक्षणे असलेल्याना डॉक्टरांचा सल्ला

    कोव्हिड टेस्ट पॉझिटिव्ह येऊन सुद्धा अनेक नागरिकांना कोणतीही लक्षणे दिसत नाहीत अथवा अतिशय सौम्य लक्षणे दिसतात, परंतु टेस्ट पॉझिटिव्ह असल्याने नागरिक घाबरून जातात व हॉस्पिटल मध्ये गर्दी करतात व त्यामुळे यंत्रणांवर अजून ताण येतो, अशा लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या नागरिकांना घरूनच डॉक्टरांचा योग्य सल्ला घेता यावा,आवश्‍यकतेनुसार औषध उपचार घेता यावा आणि त्यामुळे वैद्यकीय यंत्रणावरचा ताण कमी व्हावा यासाठी या हेल्पलाइनचा उपयोग होऊ शकेल अशी माहिती भाजयुमो प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी दिली आहे.

    हेल्पलाईनचा लाभ घ्या

    या हेल्पलाइनच्या माध्यमातून नागरिकांना फायदा व्हावा व अडचणीच्या काळात त्यांना दिलासा मिळावा यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील हे त्यांच्या सहकार्‍यांसह राज्यभरात हा उपक्रम राबविण्याचा प्रयत्न करीत आहेत. सौम्य लक्षणे असणाऱ्या अथवा कोणतीही लक्षणे नसणाऱ्या नागरिकांनी या हेल्पलाईनचा लाभ घ्यावा व आपल्या परिचितांना ही याबद्दल माहिती द्यावी, परंतु आपणास जास्त लक्षणे दिसत असल्यास अथवा त्रास होत असल्यास त्वरित तुमच्या संबंधित डॉक्टर शी संपर्क करून उपचार घ्यावेत असे आव्हान भाजयुमो प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी केले आहे.