पदवीच्या दुसऱ्या गुणवत्ता यादीत सेल्फ फायनान्स अभ्यासक्रम पुढे! कमी टक्क्यांच्या विद्यार्थ्यांना पहावी लागणार तिसऱ्या यादीची वाट

बुधवारी पदवी प्रवेशाच्या जाहीर झालेल्या दुसऱ्या यादीत काही महाविद्यालयांत वाणिज्य आणि कला शाखांत २ ते ५ टक्क्यांनी कट ऑफ खाली घसरलेला आहे तर काही महाविद्यालयांत विज्ञान शाखेचा कट ऑफ थेट २० टक्क्यांहून अधिक गुणांनी घसरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

    मुंबई : पदवी प्रवेशाच्या दुसऱ्या गुणवत्ता यादीत महाविद्यालयाच्या कट ऑफमध्ये २ ते ३ टक्क्यांची घसरण दिसून आली आहे, त्यामुळे साहजिकच ८० टक्क्यांहून कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी तिसऱ्या गुणवत्ता यादीची वाट पहावी लागणार आहे.

    बुधवारी पदवी प्रवेशाच्या जाहीर झालेल्या दुसऱ्या यादीत काही महाविद्यालयांत वाणिज्य आणि कला शाखांत २ ते ५ टक्क्यांनी कट ऑफ खाली घसरलेला आहे तर काही महाविद्यालयांत विज्ञान शाखेचा कट ऑफ थेट २० टक्क्यांहून अधिक गुणांनी घसरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

    कला , विज्ञान , वाणिज्य या शाखांबरोबरच यंदा सेल्फ फायनान्सकडे विद्यार्थ्यांचा ओढा अधिक असल्याचे दिसून आले आहे. त्याचे पडसाद एफवाय प्रवेशाच्या मेरिट लिस्टवर दिसून आले असून दुसऱ्या यादीनंतरही अनेक अभ्यासक्रमांसाठी कट-ऑफ ९० टक्क्यांवर पोहोचली होती.

    नामांकित महाविद्यालयांत हा आकडा ९२ ते ९३ च्या घरात असल्याचे दिसून आले. झेविअर्स महाविद्यालयातील बीएमएस अभ्यासक्रमाचा कट ऑफ ०. २० टक्क्यांनी वाढला आहे. इतर ठिकाणी त्यात १ ते २ टक्क्यांची घसरण दिसून आली आहे.

    read_also content=”मुंबईतील कोरोना घालविण्यासाठी BMC चा जबरदस्त प्लान; नागरिकांचा बॉडी मास इंडेक्स तपासला जाणार~https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/corporation-to-conduct-survey-of-non-communicable-diseases-in-mumbai-citizens-body-mass-index-will-be-checked-nrvk-171732/”]