प्रवेश दिल्या नंतर त्या नेत्याला पक्षात जबाबदारी द्यायची की, त्याला मंत्रिमंडळात समावेश करायचा यावरही चर्चा होणार आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या या भाजपच्या बड्या नेत्याचे नाव अजूनही गुलदस्त्यात आहे. त्यामुळे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष या बड्या नेत्याच्या राष्ट्रवादी प्रवेशावर लागले आहे.

मुंबई : शरद पवारांनी (Sharad Pawar) तातडीने घेतलेल्या राष्ट्रवादी नेत्यांच्या बैठकीमुळे (NCP’s important meeting ) राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे भाजपचा बडा ज्येष्ठ नेता (Senior BJP leader) राष्ट्रवादीच्या (NCP)  वाटेवर असल्याचे समजते आहे. त्याच नेत्याला पक्षत सामील करुन त्यावर कोणती जबाबदारी द्यायची यावर तोडगा काढण्यासाठी ही बैठक आयोजित केली असल्याचे समजते आहे. परंतु भाजपचा कोणता नेता राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहे. यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रावादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी रणनिती आखण्यासाठी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यालयात ही बैठक सुरु आहे. या बैठकीला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, अमळनेरचे राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील आणि गुलाबराव देवकर इत्यादी नेते उपस्थित आहेत. उत्तर महाराष्ट्रातील नेत्यांचे म्हणणे ऐकूण घेतल्यावरच भाजपच्या नेत्याला पक्षात प्रवेश दिला जाणार आहे.

उत्तर महाराष्ट्रातील राष्ट्रवादी पक्षाचे प्रतिनिधी म्हणून देवकर आणि अनिल पाटील यांच्या सोबत नेत्यांसह शरद पवार चर्चा करत आहेत. भाजपच्या नेत्याला पक्षात प्रवेश दिल्यावर उत्तर महाराष्ट्रातील पक्षातील राजकीय घडामोडी बदलणार आहेत. तसेच यातून कोणते फायदे आणि तोटे होतील यावरही विचार केला जात आहे. या सर्वाचा विचार केल्यावर त्या नेत्याशी बोलणार आहेत. अशी माहिती मिळाली आहे.