ujjwal nikam

ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी म्हटले आहे की, पोलिस, सीबीआय, ईडी यांना प्रसिद्धिचा रोग जडला आहे. तपासातील माहिती प्रसार माध्यमांना दिली जात आहे. यावर माध्यम म्हणतात की, सुत्रांनी ही माहिती दिली. परंतु ईलेक्ट्रॉनिक मिडियाच्या तुलनेत प्रिंट मिडियाला हा रोग नाही ते अजूनही भानावर आहेत.

मुंबई : कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या सीबीआय (CBI), ईडी (ED) यासारख्या तपाय यंत्रणा खासगी माध्यमांना माहिती देण्याचे काहीतरी कारण नक्कीच आहे. यातून कोणाला बदनाम करायचे आहे किंवा या तपासात जे निष्पन्न होईल त्याच्याशी त्यांचा काहीही संबंध नसेल असा याचा अर्थ निघतो. असे ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम ( Senior lawye Ujjwal Nikam ) यांनी म्हटले आहे. त्यांनी सुशांत प्रकरणावर सुरु अलेल्या तपासावर नाराजी व्यक्त केली आहे.

ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी म्हटले आहे की, पोलिस, सीबीआय, ईडी यांना प्रसिद्धिचा रोग जडला आहे. तपासातील माहिती प्रसार माध्यमांना दिली जात आहे. यावर माध्यम म्हणतात की, सुत्रांनी ही माहिती दिली. परंतु ईलेक्ट्रॉनिक मिडियाच्या (Media)  तुलनेत प्रिंट मिडियाला हा रोग नाही ते अजूनही भानावर आहेत.

ईलेक्ट्रॉनिक मिडिया गुन्ह्याच्या साक्षीदारांना पॅनलवर बोलावतात, त्यांची मुलाखत घेतली जाते. त्याच साक्षीदाराने तपास यंत्रनेला दिलेला जबाब वेगळा असतो आणि मिडियाला दिलेला जबाब वेगळा असतो. यामध्ये बरीत तफावत होते. मग आरोपी उलट तपासणीत असे दाखवून देतो की, त्या साक्षीदारांने विविध ठिकाणी वेगवेगळे वक्तव्य केले आहे. न्यायालयात हे पटवून देतात.

या तपास यंत्रणांना दोन खडे बोल सुनवायला सरकार का मागे पुढे पाहते, याचे उत्तर मला सापडले नाही. त्यामुळे तपास यंत्रणांवर वेळीच लगाम घातला पाहिजे, असेही अ‍ॅड. निकम म्हणाले.

व्हॉटसअ‍ॅप चॅटला कायद्याने महत्त्व

व्हॉटसअ‍ॅप चॅटला कायद्याने महत्त्व आहे. गुन्हा केला नाही हे सिद्ध करण्याची जबाबदारी फिर्यादीची असते. व्हॉटसअ‍ॅप चॅट हा न्यायालयांनी पुरावा म्हणून मान्य केला आहे. आता या प्रकरणात एनसीबीला त्या चॅटला पुष्टी देणारा पुरावा शोधावा लागेल.