ज्येष्ठ संसदपटू काळाच्या पडद्याआड, विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांची प्रतिक्रिया…

विधीमंडळाच्या सभागृहाच्या माध्यमातून अनेक सामाजिक प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली. सामान्य माणसांचे प्रश्न हिरीरीने मांडून त्यांना न्याय देण्याचे काम त्यांनी सातत्याने केले. राज्याच्या सर्वांगीण प्रगतीत मोलाचं योगदान दिलं.

    मुंबई –  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, विधान परिषदेतील कॉंग्रेसचे गटनेते आमदार शरद रणपिसे यांच्या निधनाने संसदीय प्रथा, परंपरा आणि संसदीय आयुधे यांचा अभ्यास असलेले तसेच या आयुधाचा विधीमंडळाच्या कामकाजामध्ये अचूक वापर करणारे एक अभ्यासू व मार्गदर्शक संसदपटू काळाच्या पडद्याआड गेल्याची प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज व्यक्त केली.

    विधीमंडळाच्या सभागृहाच्या माध्यमातून अनेक सामाजिक प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली. सामान्य माणसांचे प्रश्न हिरीरीने मांडून त्यांना न्याय देण्याचे काम त्यांनी सातत्याने केले. राज्याच्या सर्वांगीण प्रगतीत मोलाचं योगदान दिलं. महाराष्ट्राच्या राजकारणात विशेषत: विधानपरिषदेच्या सभागृहात त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून येणार नाही या शब्दात विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी श्रध्दांजली अर्पण केली.