राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची पुन्हा एकदा बदली

राज्यातील पोलीस दलात पुन्हा एकदा फेरबदल करण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच ४७ पोलीस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली होती. तसेच आज पुन्हा एकदा २२ पोलीस अधीक्षकांच्या बदलीचे (Maharashtra Police IPS Officer Transfer) आदेश काढण्यात आले आहेत. गृह विभागाने काल गुरुवारी (Thursday) रात्री उशिरा राज्यातील अनेक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले.

मुंबई : राज्यातील पोलीस दलात पुन्हा एकदा फेरबदल करण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच ४७ पोलीस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली होती. तसेच आज पुन्हा एकदा २२ पोलीस अधीक्षकांच्या बदलीचे (Maharashtra Police IPS Officer Transfer) आदेश काढण्यात आले आहेत. गृह विभागाने काल गुरुवारी (Thursday) रात्री उशिरा राज्यातील अनेक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले. पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम (Dr. K. Venkatesham) यांची अपर पोलीस महासंचालक म्हणून मुंबईत नियुक्ती करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता (Amitabh Gupta) यांची पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

कोणाची बदली कुठे ?

पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकपदी अभिनव देशमुख यांची वर्णी लागली आहे. तर शिवदीप लांडे यांची दहशतवादविरोधी पथकात पोलीस उपमहानिरीक्षकपदी बदली झाली आहे. विनीत अगरवाल यांची मुंबईमध्ये प्रधान सचिव (विशेष) गृह विभाग, मंत्रालय येथे बदली झाली आहे. तसेच मोहित कुमार गर्ग – रत्नागिरी पोलीस अधीक्षक, विक्रम देशमाने – ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक, राजेंद्र दाभाडे – सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक, सचिन पाटील – नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.

मनोज पाटील- अहमदनगर पोलीस अधीक्षक, प्रवीण मुंढे – जळगाव पोलीस अधीक्षक, अभिनव देशमुख – पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक, राजा रामास्वामी – बीड पोलीस अधीक्षक, प्रमोद शेवाळे – नांदेड पोलीस अधीक्षक, निखिल पिंगळे – लातूर पोलीस अधीक्षक अशा एकूण २२ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.