Sensational claim of BJP MLAs suspended by Thackeray government; Meeting with the Governor

ओबीसी आरक्षणावरील ठरावावर चर्चा सुरू असताना राजदंड उचलणे, माईक ओढणे आणि सभागृह अध्यक्षांना शिवीगाळ केल्याप्रकरणी आज एकूण १२ सदस्यांना निलंबित करण्यात आले आहे. आशिष शेलार, योगेश सागर, अभिमन्यू पवार, संजय कुटे, अतुल भातखळकर, पराग अळवणी, गिरीश महाजन, राम सातपुते, हरीश पिंपळे, नारायण कुचे, जयकुमार रावत किर्तीकुमार बागडीया आदी आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे.

    मुंबई  : महाविकास आघाडी सरकारने केलेल्या कारवाईनंतर भाजपच्या १२ सदस्यानी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली. आमच्यावर  झालेली  कारवा ई अन्यायकारक असून त्या बाबत अहवाल मागवा अशी मागणी राज्यपालाना निवेदन देवून करण्यात आली आहे. त्याबाबत कायदेशीर प्रक्रिया तपासून उचित निर्णय घेऊ असे आश्वासन राज्यपालानी दिल्याची माहिती आशिष शेलार यांनी दिली.

    ते म्हणाले की सभागृहातच नाही तर अन्य कुठेही भाजपच्या एकाही सदस्याने अपशब्द उच्चारला नाही. झालेली कारवाई एकतर्फी आहे. आम्हाला आमचे म्हणणे मांडू दिले जात नाही. काहीजणांकडून सोशल मीडियावर पसरवले जात असलेल्या व्हिडीओमध्ये असे कुठेही दिसून येत नाही की, भाजप आमदारांनी सभागृहाचा किंवा तालिका अध्यक्षांचा अवमान केला, असा दावाही शेलार यांनी केला.

    भाजपचे बारा आमदार निलंबित

    दरम्यान , ओबीसी आरक्षणावरील ठरावावर चर्चा सुरू असताना राजदंड उचलणे, माईक ओढणे आणि सभागृह अध्यक्षांना शिवीगाळ केल्याप्रकरणी आज एकूण १२ सदस्यांना निलंबित करण्यात आले आहे. आशिष शेलार, योगेश सागर, अभिमन्यू पवार, संजय कुटे, अतुल भातखळकर, पराग अळवणी, गिरीश महाजन, राम सातपुते, हरीश पिंपळे, नारायण कुचे, जयकुमार रावत किर्तीकुमार बागडीया आदी आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे.

    या वर्षभरात त्यांना मुंबई आणि नागपूर येथील अधिवेशनात सामिल होण्यास मज्जाव करण्यात आला आहे. संसदीय कामकाज मंत्री अनिल परब या बाबतच्या प्रस्तावात ही घोषणा आज विधानसभेत केली.