सुशांतसिंग राजपूतची ॲटॉप्सी करणाऱ्या डॉक्टरांचा खळबळजनक खुलासा

सीबीआयच्या टीमने डॉक्टरांना विचारले की, सुशांतची ॲटॉप्सी करण्यात इतकी घाई का केली, तर डॉक्टरांनी सांगितले की, त्यांना मुंबई पोलिसांनी तसे करण्यास सांगितले होते. १४ जूनच्या रात्री सुशांतचा पोस्टमॉर्टेम करण्यात आला होता.

मुंबई : सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. सीबीआयने या प्रकरणाचा तपासणीस सुरुवात केली आहे. शनिवारी सीबीआयची एक टीम कूपर रुग्णालयात गेली होती. कूपर रुग्णालयात सुशांतसिंग राजपूतचे पोस्टमॉर्टेम केलेल्या डॉक्टरांची विचारपूस केली. यावेळी डॉक्टरांनी खळबळजनक खुलासा केला आहे. सुशांतच्या ॲटॉप्सी करणाऱ्या डॉक्टरांनी मोठा खुलासा केला की, मुंबई पोलीसांनी त्यांना लवकर पोस्टमॉर्टेम करण्यास सांगितले होते.

ॲटॉप्सी अहवालात अनेक त्रुटी

सुशांत प्रकरणात सीबीआय टीम जलद गतीने तपास करत आहेत. सुशांतचा पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये अनेक त्रुटी आढळल्या आहेत. सुशांतसिंग राजपूत याच्या अ‍ॅटॉप्सीच्या रिपोर्ट चौकशी करण्यासाठी एम्सने शुक्रवारी फॉरेन्सिक तज्ञांची पाच सदस्यीय वैद्यकीय मंडळाची स्थापना केली आहे. शुक्रवारी सीबीआयने याप्रकरणी एम्सचे मत जाणून घेतले. या पथकाचे नेतृत्व एम्सचे फॉरेन्सिक विभाग प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता करणार आहेत.