sensex

कोरोनाच्या नव्या स्टेनच्या बातमीचा परिणाम शेअर बाजारावर होईल, अशी अटकळ लावली जात होती. मात्र ही शक्यता सध्या तरी शेअर बाजाराने फेटाळून लावल्याचीच चिन्हं दिसत आहेत. गेल्या आठवड्यातील किरकोळ पडझड वगळता शेअर बाजाराने आपली तेजी कायम ठेवली आहे.

२०२० या वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारात नव्या उच्चांकाची नोंद झालीय. बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकात नव्या विक्रमांची नोंद झाली.

सेन्सेक्सने सकाळच्या सत्रात ४७ हजार ३५४ चा विक्रमी टप्पा गाठला. तर निफ्टीनेही सकाळच्या सत्रात १३ हजार ८६५ पर्यंत मजल मारली. सर्व क्षेत्रांचे निर्देशांक सध्या वधारलेले असून बहुतांश शेअर्स हे सध्या हिरव्या रंगात दिसत आहेत. मेटल, इन्फ्रास्टक्चर आणि ऑटोमोबाईल क्षेत्रात सर्वाधिक तेजी असल्याचं दिसून येतंय.

कोरोनाच्या नव्या स्टेनच्या बातमीचा परिणाम शेअर बाजारावर होईल, अशी अटकळ लावली जात होती. मात्र ही शक्यता सध्या तरी शेअर बाजाराने फेटाळून लावल्याचीच चिन्हं दिसत आहेत. गेल्या आठवड्यातील किरकोळ पडझड वगळता शेअर बाजाराने आपली तेजी कायम ठेवली आहे.

सोनं आणि चांदी यांच्या भावातदेखील सातत्यानं वाढ होत असून आजदेखील सोन्याचा भाव ५० हजारांच्या वर आहे. सध्या सोन्याचा प्रति १० ग्रॅमचा भाव हा ५० हजार ५३५ रुपये आहे. तर चांदीचा प्रति किलो भाव हा ६९ हजार ५५१ रुपये इतका आहे.

स्थानिक गुंतवणूकदारांसोबतच परकीय गुंतवणूकदारांनी खरेदीचं सत्र सुरू ठेवल्यामुळे भारतीय शेअर बाजारात ही तेजी टिकून असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे.