भारतीय शेअर बाजाराचा नवा उच्चांक, निफ्टी आणि सेन्सेक्स नव्या उंचीवर

कोरोना संकटाच्या काळात जोरदार आपटी खाल्ल्यानंतर भारतीय शेअर बाजारांनी सावरायला सुरुवात केली आणि पूर्वीचे सर्व उच्चांक तोडत नवे उच्चांक प्रस्थापित करायला सुरुवात केली. जागतिक शेअर बाजारातील संकेतांचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर होताना दिसतो आहे. वेगवेगळ्या जागतिक इंडेक्सप्रमाणेच भारतीय शेअर बाजार आणि मुंबई शेअर बाजारात जोरदार तेजी दिसते आहे. सध्या आयटी क्षेत्रातील शेअर्स तेजीत आहेत.

भारतीय शेअर बाजारांमध्ये नव्या आठवड्याची सुरुवात जोरदार झाली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी हे भारतीय शेअर बाजारांचे दोन्ही निर्देशांक आज नव्या उंचीवर पोहोचल्याचे पाहायला मिळालं.

सेन्सेक्सनं ४९ हजारांचा पल्ला पार केला तर निफ्टी १४ हजार ४०० च्या वर पोहोचला. बाजार सुरू होताच सेन्सेक्स आणि निफ्टी हे उच्च स्तरावर ओपन झाल्याचं पाहायला मिळालं. भारतीय शेअर बाजारात गेल्या काही आठवड्यांपासून सातत्यानं वाढ होताना बघायला मिळते आहे.

कोरोना संकटाच्या काळात जोरदार आपटी खाल्ल्यानंतर भारतीय शेअर बाजारांनी सावरायला सुरुवात केली आणि पूर्वीचे सर्व उच्चांक तोडत नवे उच्चांक प्रस्थापित करायला सुरुवात केली. जागतिक शेअर बाजारातील संकेतांचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर होताना दिसतो आहे. वेगवेगळ्या जागतिक इंडेक्सप्रमाणेच भारतीय शेअर बाजार आणि मुंबई शेअर बाजारात जोरदार तेजी दिसते आहे. सध्या आयटी क्षेत्रातील शेअर्स तेजीत आहेत.

केंद्र सरकारकडून सादर होणार्‍या आगामी युनियन बजेटच्या पार्श्वभूमीवर देखील या तेजीकडं पाहिले जात आहे. कोरोना संकटातून सावरणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी या अर्थसंकल्पामध्ये काही महत्त्वाकांक्षी उपाययोजना केल्या जातील अशी अपेक्षा शेअर बाजाराला आणि उद्योग क्षेत्राला आहे. या पार्श्वभूमीवरच भारतीय शेअर बाजार नवनवे उच्चांक प्रस्थापित करत असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

प्रत्यक्षात बजेटमध्ये कुठल्या तरतुदी केल्याचं समोर येतं आणि त्याला भारतीय शेअर बाजार कसा प्रतिसाद देतो, हे बघणं महत्त्वाचं असल्याचं देखील सांगितले जाते. मात्र सध्या युनियन बजेटपर्यंत शेअर बाजारातील ही तेजी कायम राहील, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.