स्पुटनिक लसीसाठी वेगळे कोल्ड स्टोरेज उभारणार; महापौर किशोरी पेडणेकर यांची माहिती

मुंबईत कोरोना फैलाव रोखण्यासाठी लसीकरण अभियान राबवले जात आहे. लसींचा तुटवडा दुर करण्यासाठी महापािलका रशियाची स्पुटनिक लस मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनसाठी पािलकेने वेगळे कोल्ड स्टोरेज उभारले आहे. आता स्पुटनिक लसीसाठी वेगळे कोल्ड स्टोरेज उभारले जाणार असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

    मुंबई : मुंबईत कोरोना फैलाव रोखण्यासाठी लसीकरण अभियान राबवले जात आहे. लसींचा तुटवडा दुर करण्यासाठी महापािलका रशियाची स्पुटनिक लस मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनसाठी पािलकेने वेगळे कोल्ड स्टोरेज उभारले आहे. आता स्पुटनिक लसीसाठी वेगळे कोल्ड स्टोरेज उभारले जाणार असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

    मुंबईत लसींच्या कमतरतेमुळे पालिकेने ग्लोबल टेंडर काढले होते. त्यात भाग घेणाऱ्या कंपन्या कायदेशीर प्रक्रीया पुर्ण करु शकल्या नाहीत. त्यामुळे टेंडर स्थगित केले होते. दरम्यान जुन अखेर कंपनी काही प्रमाणात लसींचा साठी उपलब्ध करुन देण्यास तयार आहे. त्यासाठी कोल्ड स्टोरेजची आवश्यकता आहे. कंपनीच्या सुचनेनुसार कोल्ड स्टोरेज उभारण्यात येणार आङे. पालिकेने कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लसींचा साठा ठेवण्यासाठी कांजूरमार्ग येथे कोल्ड स्टोरेज उभारले आहेत. त्याच पध्दतीने स्पुटनिकच्या लसींचा साठा ठेवण्यासाठी कोल्ड स्टोरेज उभारण्यात येणार आहे. मुंबई शहर, पश्चिम उपनगर, पूर्व उपनगर मध्ये हे स्टोरेज उभारण्यात येणार आहे.

    नागपुरमधील मेडिकल कॉलेजमध्ये मुलांच्या लसीकणासाठी चाचण्या सुरू आहेत. मात्र मुंबई महापालिकेला अद्याप केंद्र सरकारने मुलांच्या लसीकरणासाठी परवानगी दिलेली नाही. पालिकेने मुलांच्या लसीकरणासाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागितली आहे. केंद्राची परवानगी मिळताच मुलांचे लसीकरण सुरू करण्यात येईल असे महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

    हे सुद्धा वाचा