मुंबईत कोरोनाचे सात डेंजर स्पॉट; BMC कडून कठोर अंमलबजावणी करण्यास सुरुवात

रुग्णांची संख्या वाढत असून यात सात विभागातील रुग्णसंख्य़ेचा आलेख अद्याप वाढताच राहिलेला आहे. यामध्ये अंधेरी, गोरेगाव, कांदिवली, घाटकोपर, वांद्रे, मालाड व बोरीवली या सात विभागात तीन दिवसांतील रुग्णसंख्या प्रत्येकी एक हजार ते दीड हजारावर पोहचली आहे. सर्वाधिक रुग्णसंख्या असलेले हे विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत.

    मुंबई : रुग्णांची संख्या वाढत असून यात सात विभागातील रुग्णसंख्य़ेचा आलेख अद्याप वाढताच राहिलेला आहे. यामध्ये अंधेरी, गोरेगाव, कांदिवली, घाटकोपर, वांद्रे, मालाड व बोरीवली या सात विभागात तीन दिवसांतील रुग्णसंख्या प्रत्येकी एक हजार ते दीड हजारावर पोहचली आहे. सर्वाधिक रुग्णसंख्या असलेले हे विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत.

    पालिकेने रुग्ण आढळणाऱ्या ठिकाणांवर अधिक लक्ष वेधले असून निय़मांची कठोर अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. पाच पेक्षा अधिक रुग्ण आढळणाऱ्या मायक्रो सोसायट्या मायक्रो कंटेनमेंट म्हणून घोषित केल्या जात असून उपाययोजना करण्यात येत आहेत.

    यामध्ये प्रतिबंधित क्षेत्रातील सोसायट्यांच्या पदाधिकार्‍यांवर विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे. क्वारंटाइनचे नियम मोडणार्‍यांची पालिकेकडे तक्रार करणे, स्क्रिनिंग, ऑक्सिजन पातळी मोजणे, बाहेरील व्यक्तीस प्रवेश बंदी, जीवनावश्यक वस्तू सोसायटीच्या गेटवर स्वीकारणे, पॉझिटिव्ह रुग्णाची माहिती प्रशासनाला द्यावी अशा उपाययोजना कराव्यात अशा सूचना सोसायट्यांना केल्या आहेत. कोरोनाचे नियम मोडणाऱ्या सोसायट्या व संबंधित व्यक्तींवर कड़क कारवाई केली जाणार आहे.