सेव्हन हिल्स रुग्णालयात कोरोनाबाधिताची आत्महत्या

मुंबई : मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात मागील काही दिवसांपासून उपचार घेत असलेल्या एका ६० वर्षीय व्यक्तीने रुग्णालयातील टेरेसवर गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही व्यक्ती विक्रोळी येथे राहणारी

 मुंबई : मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात मागील काही दिवसांपासून उपचार घेत असलेल्या एका ६० वर्षीय व्यक्तीने रुग्णालयातील टेरेसवर गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हा रुग्ण विक्रोळीचा राहणारा होता. याबाबत एम. आय.डी. सी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्युची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नसून पोलीस याबाबत तपास करत आहेत.

मृत ६० वर्षीय व्यक्तीला ७ मे रोजी सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ही व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह होती. शनिवार दुपारी १२.४५ च्या सुमारास डॉक्टर व नर्सेस यांची नजर चुकवुन हा रुग्ण रुग्णालयाच्या नवव्या मजल्यावरील टेरेसवर गेला आणि तिथे लोखंडी अँगल पायजम्याला बांधुन गळफास घेऊन आत्महत्या केली. हा रुग्ण विक्रोळी, हरियाली व्हिलेज येथे राहणारा होता. एम. आय. डी. सी. पोलिसांनी याबाबत अपघाती मृत्युची नोंद केली असून आत्महत्या का केली याबाबत अधिक तपास करत असल्याचे सांगण्यात आले.