डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या रक्तदान शिबिरामध्ये ७ हजारपेक्षा जास्त लोकांनी केले रक्तदान

चेंबूर :राज्यासह मुंबई शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून रुग्णांसाठी रुग्णालयात रक्तपुरवठा कमी पडत असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केले असता राज्यातील स्वयंसेवी संस्थाकडून

चेंबूर :राज्यासह मुंबई शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून रुग्णांसाठी रुग्णालयात रक्तपुरवठा कमी पडत असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केले असता राज्यातील स्वयंसेवी संस्थाकडून प्रतिसाद मिळाला. आध्यात्मिक आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने राज्यात मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईच्या वरळी , दादर आणि आज चेंबूरमध्ये पार पडलेल्या या शिबिराला श्री सदस्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.आतापर्यंत प्रतिष्ठानने ७ हजार रक्ताच्या बाटल्या जमा केल्या आहेत. सामाजिक आणि आध्यात्मिक कार्यात ही प्रतिष्ठान नेहमी अग्रेसर असते. निरुपणाच्या माध्यमातून श्रीसदस्यांना मानवता हाच धर्म आणि माणुसकी हीच जात ही शिकवण दिली जाते. देशाने आपल्याला काय दिले यापेक्षा आपण देशासाठी काय दिले पाहिजे ही ओळख घेऊन प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिरे घेण्यात आल्याचे अमित बनगे यांनी सांगितले. यावेळी शासनाने लावून दिलेल्या शिस्तीचे पालन श्रीसदस्यांकडून होत असल्याचे दिसून आले.