अत्यावश्यक सेवेतील  ७० हजार कर्मचाऱ्यांनी केला रेल्वे प्रवास – रेल्वेला मिळाले २१.८० लाख इतके उत्पन्न

मुंबई: अत्यावश्यक सेवेसाठी कार्यरत असलेल्या सरकारी व वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी सोमवारपासून रेल्वे सेवा सुरु झाली आहे, मागील तीन महिन्यांपासून मुंबईची लाईफलाईन बंद होती. सोमवारी अनेक सरकारी

 मुंबई: अत्यावश्यक सेवेसाठी  कार्यरत असलेल्या सरकारी व वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी सोमवारपासून रेल्वे सेवा सुरु झाली आहे, मागील तीन महिन्यांपासून मुंबईची लाईफलाईन बंद होती. सोमवारी अनेक सरकारी कार्यालयात कर्मचाऱ्यांची कमी उपस्थिती होती. पण मंगळवारी मात्र रेल्वेने प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्याची संख्या वाढल्याचे दिसून आली. मंगळवारी वेस्टर्न रेल्वेने साधारण ३५ हजार नागरिकांनी प्रवास केला, तर हार्बर आणि सेंट्रल मार्गावरही ३५ हजार पेक्षा अधिक प्रवशानी प्रवास केला. ज्यामुळे सेंट्रल रेल्वेला तिकीट आणि सीजन पासमुळे १३ लाख १६९७१ रुपये रक्कम जमा झाली. वेस्टर्न रेल्वेला तिकीट आणि सीजन पासमुळे ८ लाख ६२९३१ रक्कम मिळाली. येत्या काही दिवसांत या रकमेत वाढ होईलच, दरम्यान, १.२५ लाख अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांकरिता ही रेल्वे सेवा सुरु करण्यात आली आहे.