Storm surge at Mumbai's Kovid Center for vaccinating Korana; Pushback, confusion

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे नागरिक भीतीपोटी कोरोना लस घेण्यासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार झाले आहेत. मात्र सरकार आणि पालिका अधिकारी लोकांना सुविधा देण्यात असमर्थ ठरताना दिसत आहेत. असाच प्रकार बीकेसी येथील लसीकरण केंद्रावर घडत आहे. लस घेण्यासाठी आज येथे भर उन्हात लांबच लांब रांगा लागल्या होत्या. एकेकाला त्याचा नंबर येऊपर्यंत तब्बल ४ ते ५ तासांचा अवधी लागत होता. भर उन्हात त्यांनी लावलेल्या रांगा आणि प्रशासनाने येथे कोणतेही न उभारलेले छप्पर यामुळे आज काही ज्येष्ठ नागरिकांना भोवळ येण्याचे प्रकार घडले असल्याचे त्यांनी दैनिक, 'नवराष्ट्र' शी बोलताना सांगितले.

    मुंबई : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे नागरिक भीतीपोटी कोरोना लस घेण्यासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार झाले आहेत. मात्र सरकार आणि पालिका अधिकारी लोकांना सुविधा देण्यात असमर्थ ठरताना दिसत आहेत. असाच प्रकार बीकेसी येथील लसीकरण केंद्रावर घडत आहे. लस घेण्यासाठी आज येथे भर उन्हात लांबच लांब रांगा लागल्या होत्या. एकेकाला त्याचा नंबर येऊपर्यंत तब्बल ४ ते ५ तासांचा अवधी लागत होता. भर उन्हात त्यांनी लावलेल्या रांगा आणि प्रशासनाने येथे कोणतेही न उभारलेले छप्पर यामुळे आज काही ज्येष्ठ नागरिकांना भोवळ येण्याचे प्रकार घडले असल्याचे त्यांनी दैनिक, ‘नवराष्ट्र’ शी बोलताना सांगितले.

    वांद्रे येथील बीकेसी मैदानात राज्य सरकारने कोविड सेंटर आणि लसीकरण केंद्र उभारले आहे. येथे चांगली सुविधा मिळते म्हणून या केंद्रावर सकाळी ९ वाजल्यापासून पूर्व आणि पश्चिम उपनगरातील अनेक नागरिक लसीकरणाची येतात. घाटकोपर येथे राहणारे एक माजी पोलीस अधिकारी आणि जेष्ठ नागरिक अरुण बनसोडे हे काल (शुक्रवारी) येथे लसीकरणासाठी त्यांचे मित्र प्रकाश यांच्यासह येथे आले होते. मात्र त्यांचा नंबर न आल्याने दुसऱ्या दिवशी आज (शनिवारी) पुन्हा या सर्वांनी अकाली ९ वाजल्यापासून येथे कुटुंबासह रांग लावली होती. मात्र या केंद्रावर होणाऱ्या प्रचंड गर्दीमूळे त्यांचा नंबर दुपारी साडेतीन पर्यंत आलाच नाही. या काळात रणरणत्या भर उन्हात या सर्वांना येथे डोक्यावर छत अथवा बसायला खुर्च्या नसल्याने नाईलाजाने उभे राहूनच रांग लावावी लागली. त्यामुळे यादरम्यान बनसोडे यांना भोवळ आल्याचे त्यांनी सांगितले.

    असे प्रकार अनेकांच्या बाबत घडत असूनही येथे लोकांना पिण्याचे पाणी, नागरिकांना रांगेत उभे राहताना त्यांच्या डोक्यावर छत या सुविधा देण्यात प्रशासनाने निष्काळजीपणा केल्याचे येथे लसीकरणाची आलेल्या प्रकाश भाई यांनी सांगितले. ऐन उन्हात येथे पाण्याची व्यवस्था नसल्याने दूरवर एका स्टॉलवरून पाण्याच्या बाटल्या विकत घ्याव्या लागतात. त्याही थंड असल्याने नागरिकांची परवड होताना दिसत होती. येथे सकाळपासून लोक रांगा लावतात तरीही प्रशासनाकडून त्यांच्यासाठी छत, खुर्च्या आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली नसल्याचा आरोप येथे आलेल्या नागरिकांतून करण्यात येत आहे. दरम्यान, येथे नागरिकांच्या रोज भल्यामोठ्या रांगा लागत आहेत. त्या बाजूच्या मुख्य रस्त्यावर जात आहेत. ऱयामुळे नागरिकांना भर उन्हात ताटकळत रांग लावावी लागत असूनही प्रशासन ढिम्म आहे असेही येथील नागरिकांकडून सांगण्यात आले.

    आम्ही काल या ठिकाणी सकाळपासून दुपारी ३ पर्यंत येथील रांगेत उभे होतो. मात्र लस संपल्याने परत पाठवण्यात आले. आज पुन्हा येथे आलो आहोत मात्र रांगा मोठ्या असल्याने भर उन्हात उभे राहावे लागले. त्यामुळे मला चक्कर आली. असे प्रकार अनेकांच्या बाबत घडत आहेत. त्यामुळे मी येथील संबंधित अधिकारी आणि पोलिसांच्या कानावर घालून ज्येष्ठ नागरिकांना छत, पाणी आणि बसायला खुर्च्यांची व्यवस्था करण्याबाबत विनंती केली आहे.

    - अरुण बनसोडे, निवृत्त पोलीस अधिकारी